Ronaldo and Al Nasser : ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी अरेबियाच्या अल नासेरशी करारबद्ध | पुढारी

Ronaldo and Al Nasser : ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी अरेबियाच्या अल नासेरशी करारबद्ध

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  इंग्लिश प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर युनायटेडने स्टार फुटबॉलपटू Cristiano Ronaldo याचा करार रद्द केल्यानंतर तो आता सौदी अरेबियाच्या क्लब अल नासेरसोबत खेळताना दिसणार आहे.( Ronaldo and Al Nasser ) स्पॅनिश वृत्तपत्र मार्काच्या वृत्तानुसार, पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोने अल नासेरसोबत अडीच वर्षांचा करार करण्यास सहमती दर्शवली आहे. रोनाल्डो सध्या फिफा विश्वचषक खेळत आहे.

Ronaldo and Al Nasser :  एका हंगामासाठी मिळणार 1,728 कोटी रुपये

अहवालानुसार, 37 वर्षीय रोनाल्डोला अल नासेर येथे एका हंगामासाठी 1,728 कोटी रुपये (200 दशलक्ष युरो) मिळतील. अलीकडेच इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेडने एका वादग्रस्त मुलाखतीनंतर रोनाल्डोचा करार रद्द केला. तेव्हापासून रोनाल्डो नवीन फुटबॉल क्लबच्या शोधात होता. रोनाल्डोला अल नासेरची ऑफर गेल्या आठवड्यातच आली होती. मात्र, विश्वचषकादरम्यान ग्रुप स्टेजवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

हेही वाचा :

 

Back to top button