पुढारी ऑनलाईन डेस्क : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) हीच योग्यवेळ आहे नवे आव्हान स्वीकारण्याची असे सूचक ट्वीट करूत मॅंचेस्टर युनायटेडला अलविदा म्हटलं. रोनाल्डोला करारातून मुक्त केल्याचे निवदेनही मँनचेस्टर युनायटेड क्लबने जाहीर केले आहे. क्लबने आपल्या अधिकृत ट्विटवर अकाउंटवरून मंगळवारी (दि २२) याची माहिती दिली. दोघांच्या संमतीने करार संपुष्टात आल्याचे समोर येत आहे. क्लबने रोनाल्डोला त्याच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
मँनचेस्टर युनायटेडने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ख्रिस्तियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) मँनचेस्टर युनायटेड परस्पर कराराने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये त्याने त्याच्या कारकिर्दीत दोनवेळा दिलेल्या योगदानाबद्दल क्लबने त्याचे आभार मानले. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा क्लबने निवेदनातून दिल्या आहेत. रोनाल्डोने युनाययटेडसाठी ३४६ सामन्यांत १४५ गोल नोंदवले आहे.
रोनाल्डोने काही दिवसांपूर्वी पियर्स मॉर्गन यांना मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने क्बलविषयी आणि तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी खळबळजनक विधाने केली होती. रोनाल्डोने मॉर्गनला दिलेल्या मुलाखतीवेळी म्हटलं होते की, "ऍलेक्स फर्ग्युसन यांनी मॅनेजर पदाची धुरा सोडल्यानंतर क्लबची प्रगती झालेली नाही."
मॅनेजर एरिक टॅन हॅग यांच्याबाबत तो म्हणाला की, माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर नाही, कारण ते ही मला आदर सन्मान देत नाहीत. तुम्ही मला सन्मान देत नसाल तर मग मी पण का देऊ. युनायटेड क्लबचे काही अधिकारी तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत का? यावर तो म्हणाला, "हो, मला तशी जाणीव होत आहे की, क्लबमधील तीन ते चार अधिकारी मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असून मला धोका देत असल्याची जाणीव होत आहे."
ॲलेक्स फर्ग्युसनपासून अनेक मॅनेजर आले आणि गेले; परंतु कोणीही त्यांच्यासारख यशस्वी झाले नाही. अलीकडेच फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने क्लबबाबत वादग्रस्त मुलाखत दिली, ज्यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. आता रोनाल्डोने मँनचेस्टर युनायटेडला रामराम करत नवीन आव्हाने स्वीकारण्यास सज्ज असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा;