Jacqueline Fernandez Mother : जॅकलीन फर्नांडिसच्या आईला हार्ट अटॅक | पुढारी

Jacqueline Fernandez Mother : जॅकलीन फर्नांडिसच्या आईला हार्ट अटॅक

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ( Jacqueline Fernandez Mother ) आई किम फर्नांडिस यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर किम फर्नांडिस यांना ताबोडतोब बहरीनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जॅकलीनची आई-वडील बहरीनमध्ये तर जॅकलीन फर्नांडिस ( Jacqueline Fernandez Mother ) मुंबईत राहते. एका सुत्राच्या माहितीनुसार, किम फर्नांडिस यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर सध्या त्यांची तब्येत सुधारत असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

जॅकलीन नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले आणि कुटूंबियाचे फोटो शेअर करत असते. गेल्या वर्षी ख्रिसमस साजरा करण्यासाठी आई- वडीलांसोबत ती निघाली होती. परंतु, याच दरम्यान तिला एअरपोर्टवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं.

 सुकेशने जॅकलिनला दिल्‍या होत्‍या १० कोटींच्‍या भेटवस्तू

‘ईडी’च्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सुकेश याने जॅकलिन फर्नांडिसला १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये विविध प्रकारची आभुषणे, हिरेजडीत दागिने, क्रॉकरी, चार फ्रेंच जातीची मांजरे (एका मांजराची किंमत अंदाजे एक लाख रूपये) आणि ५२ लाख रूपये किंमतीचा एक घोडा पण आहे.

त्याचबरोबर सुकेशने जॅकलीनचा भाऊ आणि बहिणीलाही मोठी रक्कम पाठवली होती. त्यानंतर ‘ईडी’ने जॅकलिनच्या जवळचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती.त्याचबरोबर सुकेशने नोरा फतेहीलाही बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट दिला होता. त्याची एकूण किंमत एक कोटींहून अधिक होती. तिहार तुरुंगातून 200 कोटी वसूल केल्याप्रकरणी मनी लाँड्रिंग अंतर्गत दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.

जॅकलीन फर्नांडिसकडे अक्षय कुमार आणि नुसरत भरुच्चा यांच्या ‘राम सेतू’, सलमान खानसोबत ‘किक 2’, रणवीर सिंगसोबत ‘सर्कस’ आणि अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button