Anushka Sharma : अनुष्का शर्माचे कमबॅक! झुलन गोस्वामीच्या बायोपिक ‘Chakda Express’चा फर्स्ट लूक रिलीज | पुढारी

Anushka Sharma : अनुष्का शर्माचे कमबॅक! झुलन गोस्वामीच्या बायोपिक 'Chakda Express'चा फर्स्ट लूक रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मॅटर्निटी इंटरव्हलनंतर पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘Chakda Express’मध्ये अनुष्का मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनुष्का झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान महिला गोलंदाजांपैकी एक असलेल्या झुलन गोस्वामीच्या गौरवशाली प्रवासावर आधारित आहे.

या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करताना अनुष्का शर्माने चित्रपटाविषयी खास माहिती दिली आहे. आज नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या पुढील चित्रपट ‘Chakda Express’ची घोषणा केली. अनुष्का शर्मा अभिनीत हा चित्रपट क्लीन स्लेट फिल्म्स निर्मित आणि प्रोसित रॉय दिग्दर्शित आहे. झुलन गोस्वामीच्या अविश्वसनीय कथेवरून हा चित्रपट प्रेरित आहे. (Anushka Sharma)

‘Chakda Express’ बद्दल अनुष्का शर्मा (Anushka Sharma) म्हणाली, ‘हा खरोखरच खास चित्रपट आहे. ही एक एका संघर्षाची आणि त्यागाची कथा आहे. Chakda Express ही भारताची माजी कर्णधार झुलन गोस्वामी यांचा बायोपिक आहे. ज्या वेळी झुलनने क्रिकेटपटू बनण्याचा आणि जागतिक स्तरावर आपल्या देशाचा गौरव करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा महिलांसाठी हा खेळ खेळण्याचा विचार करणेही कठीण होते. हा चित्रपट तिच्या आयुष्याला आणि महिला क्रिकेटला आकार देणारी अनेक उदाहरणांची नाट्यमय कथा आहे.

अनुष्का (Anushka Sharma) पुढे म्हणते, भारतातील महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवणाऱ्या झुलन आणि तिच्या सहकाऱ्यांना आपण सर्वांनी सलाम केला पाहिजे. तिची मेहनत, तिची आवड आणि महिला क्रिकेटकडे लक्ष वेधून घेण्याचे तिचे ध्येय कौतुकास्पद आहे. तिने आपल्या कामगिरीने येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श ठेवला आहे. भारतीय लोक क्रिकेट खेळावर जीवापाड प्रेम करतात. एक महिला म्हणून मला झुलनची कहाणी ऐकून अभिमान वाटतो आणि तिचे जीवन प्रेक्षक आणि क्रिकेटप्रेमींसमोर आणण्याचा प्रयत्न करणे हा माझा सन्मान आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button