जेव्हा मी बाहेर पडेन, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असेल : शिवलीला पाटील | पुढारी

जेव्हा मी बाहेर पडेन, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असेल : शिवलीला पाटील

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेट प्रक्रिया होईल. नाव मोठे लक्षण खोटे या पार पाडलेल्या नॉमिनेशन कार्यात सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले आहे. दरम्यान, शिवलीला पाटील यांनी या घरातील अनुभव सांगितले. शिवलीला पाटील यांनी आपले मत व्यक्त करत घरात काय चालंत, हे कथन केलं आहे.

घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या सर्व गोष्टी नॉमिनेशनसाठी असतील. या निकषांवर घरातील सदस्यांनी एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले आहे.

नॉमिनेट झालेल्या सदस्यांना वाटू शकते की त्यांचे योगदान अधिक आहे. याचसाठी त्या सदस्यांना व्यक्त होण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. तसेच सुरक्षित सदस्यांपैकी कोणता सदस्य नॉमिनेट व्हायला हवा होता.

याच कार्यामध्ये स्नेहा आणि मीनलमध्ये भांडण झाले. आज जय, विकास आणि शिवलीला त्यांची मते मांडताना दिसणार आहेत.

जय म्हणाला, “सोनाली मी तुझं नाव घेईन, तू खूप स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी आहेस. तू मला खेळात मात देशील आणि म्हणून मी तुला घाबरतो. मी मस्ती नाही करत आहे. मी खरं बोलतो आहे. मी तुला competitor म्हणून घाबरतो, असं मी तुला तोंडावर सांगतो. तर या प्रक्रियेत विकासने स्नेहाचे नावं घेतले.

शिवलीला म्हणाल्या, मला मान्य आहेत सगळ्या गोष्टी. मला गेम कळायला थोडा वेळ लागला. पण इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग दिसेल. बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे. इथे फक्त काड्या, कुचर्‍या एवढचं केलं जातं असं प्रत्येक जण म्हणतं. पण मी असा विचार करून आले होते.

जेव्हा इथे येईन ना तेव्हा प्रत्येक माणूस माझा असेल. मी आठ दिवस जरी राहिले ना तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन. त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल.

अजून पुढे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय काय झालं जाणून घ्या. बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

Back to top button