गेवराई शहरातील दुकानाला आग, २५ लाखांचे नुकसान | पुढारी

गेवराई शहरातील दुकानाला आग, २५ लाखांचे नुकसान

गेवराई; पुढारी वृत्तसेवा: गेवराई शहरातील कोल्हेर वेस जवळील माळी गल्ली येथील एक इलेक्ट्रॉनिक तसेच दोन ज्वेलर्सच्या दुकानाला सोमवारच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्टशर्किटने आग लागली. या दुर्घटनेत इलेक्ट्रॉनिक दुकानाचे जवळपास १४ लाखांचे, न्यू. ओम ज्वेलर्सचे ५ लाखांचे आणि बालाजी ज्वेलर्सचे ६ लाखांचे असे एकूण मिळून सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे.

सोमवारी (दि. २७) रोजी मध्यरात्री अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला यश आले नाही. यात सर्व काही जळून खाक झाले.

गेवराई शहरातील कोल्हेर वेस जवळील माळी गल्ली येथील आदित्य इलेक्ट्रॉनिक, न्यु. ओम ज्वेलर्स तसेच बालाजी ज्वेलर्स हे दुकाने असून या दुकानाला सोमवारच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्टशर्किटने आग लागली .बघता- बघता आगीने रौद्र रूप धारण करत आगीचा डोम उसळला.

दुकानाच्या आजुबाजुच्या नागरिकांना आगीची माहिती मिळताच, दुकान मालकाला माहिती देत अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, आगीत सर्व काही जळून खाक झाले.

या घटनेत आदित्य इलेक्ट्रॉनिक दुकानाचे जवळपास १४ लाखांचे, न्यू. ओम ज्वेलर्सचे ५ लाखांचे आणि बालाजी ज्वेलर्सचे ६ लाखांचे असे एकूण मिळून सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे.

मडकर यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button