HBD महेश कोठारे : इन्स्पेक्टर महेश जाधव आजही मराठी मनात..! | पुढारी

HBD महेश कोठारे : इन्स्पेक्टर महेश जाधव आजही मराठी मनात..!

स्वालिया शिकलगार; पुढारी ऑनलाईन : कधी विनोदी भूमिका तर कधी गंभीर भूमिकांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवणारे महेश कोठारे. आज त्यांचा वाढदिवस. त्यांना (२८ सप्टेंबर) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! महेश कोठारे यांनी अनेकवेळा इन्स्पेक्टरची भूमिका  साकारली. बहुतांशी चित्रपटात त्यांची इन्स्पेक्टर महेश जाधव ही व्यक्तीरेखा होती. पण, महेश जाधव हे पात्र कुठून आलं? आणि तो ‘डॅमिट’ हा त्यांचा गाजलेला संवाद आला कुठून? हे पाहूया.

बालपणापासून अभिनय

तुम्हाला माहितीये का? कोठारे यांनी बालकलाकार म्हणूनही काम केलंय. ‘छोटा जवान’ या चित्रपटापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात कली. त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण केलं. यामध्ये ते यशस्वीदेखील ठरले.

अभिनयाबरोबरचं दिग्दर्शन

दिग्दर्शनाकडे वळायची महेश यांची पहिल्यापासून इच्छा होती. धुमधडाका हा पहिला दिग्दर्शित चित्रपट होता. हा चित्रपट प्यार किया जा…या हिंदी सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची अफलातून केमिस्ट्री या चित्रपटात दिसली.

नायक आणि खलनायकाची भूमिकाही त्यांनी मोठ्या पडद्यावर गाजवल्या. महेश यांनी बीएससीदेखील केलं आहे. तसेच एलएलबी ही कायद्यातील पदवीदेखील मिळवलीय. काही वर्षे त्यांनी वकिलीदेखील केली.

धुमधडाका रिलीज दरम्यान, त्यांनी प्रॅक्टिस आणि सिनेमा असं दोन्ही सुरू ठेवलं होतं.

धुमधडाका रिलीज झाल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस सोडली आणि पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात उतरायचं ठरवलं.

महेश धुमधडाक्याला लक्ष्या कसा सापडला, याविषयी आठवण सांगतात की, झोपी गेलेला जागा झाला हे नाटक होतं. त्यात बबन प्रभूच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्यासाठी शोध सुरू होता. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी सुचवंल की नवीन मुलगा आहे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून. बेर्डे चांगला अभिनय करतो. त्याचा अभिनय बघायला जा. दुसऱ्या दिवशी महेश हे लक्ष्याला बघायला गेले आणि धुमधडाक्यासाठी त्याला थेट कास्ट केलं.

पुढे महेश-लक्ष्याने अनेक चित्रपट केले. त्यांच्यात इतकी मैत्री झाली होती की, महेश-लक्ष्या ही  जाेडी पडद्‍यावर सूपरहिट ठरली.

वकील ते यशस्वी अभिनेता-दिग्दर्शक, खलनायक

मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेबरोबरच खलनायकीचे पात्रदेखील त्यांनी साकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही त्यांनी साकारल्या आहेत.

झपाटलेला चित्रपटाचा असाही किस्सा

ज्या ज्या चित्रपटांमध्ये महेश जाधव हे पात्र साकारलं, त्या -त्या चित्रपटांमध्ये ते कर्तव्यदक्ष भूमिकेत दिसले. चित्रपटात इन्स्पेक्टर महेश जाधव हे नाव असायचं. झपाटलेला हा मोठा प्रयोग होता. या चित्रपटात महेश यांची इन्स्पेक्टर महेश जाधव ही भूमिका होती.

इन्स्पेक्टर महेश जाधव हे पात्र आलं कुठून?

महेश हे क्रिमिनल वकील होते. त्यामुळे त्यांचा पोलिसांशी फार जवळचा संबंध आला. मला पोलिसांविषयी आकर्षण होतं. म्हणून मी स्वत: इन्स्पेटक्टर महेश जाधव झालो, असे महेश सांगतात. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एकदा ते रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांच्या शोला गेले होते. त्यावेळी त्यांनी विचार केला की, जर हा बाहुला जिवंत झाला, तर लक्ष्या काय करेल. तेव्हा तात्या विंचूचा झपाटलेला केला. अर्थातंच लक्ष्या मुख्य भूमिकेत होता.

ते ‘डॅमिट’ नेमकं आलं कुठून?

महेश यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कॉलेजपासून डॅमिट म्हणायची सवय होती. जी एम हार्डलीची पुस्‍तक वाचली होती. त्यातील कॅरेकटर डॅमिट डॅमिट करायचा. त्यामुळे कोणत्‍याही परिस्‍थितीत डॅमिट म्हणत सुटायचो.

धुमधडाका चित्रपटाचा किस्सा

धुमधडाका या नावाऐवजी तुमचा जावई होऊनचं दाखवतो, लेकी पळाल्या सासरला असत्या असे चित्रपटाचे टायटल समोर आले होते. पण, महेश यांना धुमधडाका हेचं नाव योग्य वाटलं. नावाप्रमाणेच या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धुमधडाका केला. धुमधडाका चित्रपटामध्ये अशोक, महेश आणि लक्ष्याची अफलातून जोडी जमली.

धुमधडाका चित्रपटामध्ये निवेदिता, सुरेखा आणि प्रेमाकिरण त्याचबरोबर शरद तळवलकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. महेश आणि अशोक यांची घट्ट मैत्री यामध्ये दाखवण्यात आली आहे. अशोक आपला प्रिय मित्र महेशसाठी त्याचा श्रीमंत उद्योजक बाप बनून शरद तळवलकरांच्याकडे जातो.

तेथे महेशची प्रेयसी अर्थातच निवेदिता जोशी आणि अप्रत्यक्षपणे त्याला त्याची प्रेयसी सुरेखा भेटते.

महेशच्या वृध्द बापाची भूमिका अशोक सराफ यांनी साकारली होती. अशोक यांचा ‘वख्या विखी वूखू’ हा डायलॉग प्रचंड गाजला.

धुमधडाका या चित्रपटाची आणखी एक खासियत अशी की, या चित्रपटासाठी लक्ष्याने केवळ १ रुपया मानधन घेतला होता. महेश कोठारे आपला पहिलाच चित्रपट दिग्दर्शन करत होते.

चित्रपटासाठी त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्यांनी धुमधडाका चित्रपटातील पात्रासाठी लक्ष्याशी बोलल्यानंतर खिशातून एक रुपया काढून लक्ष्याला दिला. लक्ष्याला भूमिका मिळाली आणि कोठारेंना लक्ष्या मिळाला होता.

खलनायकही विचित्र

महेश यांच्या चित्रपटातील खलनायकही नावाने आणि दिसायलाही विचित्र असायचे. धडाकेबाजमधील कवट्या महाकाळ, तात्या विंचू, माझा छकुलामधील टकलू हैवान, कुबड्या खवीस कसली कसली नावे होती. पण, या नावांनीचं चित्रपटाला दुसऱ्या बाजूने नावलौकीक मिळवून दिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

धडाकेबाज, झपाटलेला, थरथराट, माझा छकुला, खरतनाक, दे दणादण, देवता, जबरदस्त, शूभ मंगल यासारखे असंख्य चित्रपट महेश यांनी केले आहेत.

प्रेक्षकांची नाडी ही महेश यांच्या चित्रपटांशी जोडली गेलीय. त्यामुळे आजही हे चित्रपट टीव्हीवर लागले की, ती पाहण्याची संधी चाहते चुकवत नाही.

मराठी माणसाच्या मनात आजही महेश कोठारे नावाने घर केलं आहे.!

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Kothare (@maheshkothare)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Kothare (@maheshkothare)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Kothare (@maheshkothare)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Kothare (@maheshkothare)

Back to top button