Ranbir Kapoor HBD : रणबीर ऐश्वर्याला किस करताना का घाबरला?  - पुढारी

Ranbir Kapoor HBD : रणबीर ऐश्वर्याला किस करताना का घाबरला? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाॅलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर आणि नितू सिंह यांचा मुलगा बाॅलिवुडमधील रणबीर कपूर (Ranbir Kapoor HBD) याचा आज २८ सप्टेंबर हा वाढदिवस. या जन्मदिनाचं निमित्त साधून आपण आज ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूरच्या प्रेमप्रकरणाचा तथाकथित किस्सा जाणून घेऊ…

ऐश्वर्या आणि रणबीर या दोघांनी ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात बोल्ड सीन दिलेले होते. या चित्रपटाच्या संदर्भात रणबीर (Ranbir Kapoor HBD) एक मुलाखतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलेलं होते. त्यामुळे बच्चन परिवार रणबीरवर खूप नाराज झालं. पण, हा किस्सा खूप गाजला होता.

‘जज्बा’ आणि ‘सरबजीत’ हे ऐश्वर्या रायची सिनेमे फ्लाॅप गेलेली होती. त्यामुळे पुन्हा कमबॅक करण्यासाठी ऐश्वर्या राय धडपडत होती. अशात प्रसिद्ध दिग्दर्शक करण जौहारने ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांच्यासाठी एक इंटीमेट सीन प्लॅन केला.

तर किस्सा असा होता की, जेव्हा या चित्रपटाच्या शुटिंगवेळी ऐश्वर्याला रणबीरचा किस घेण्यास सांगण्यात आले, तेव्हा तिने नकार दिला. या नकारामागे ऐश्वर्याने सांगितले की, मी हा किसिंग सीन देऊ शकत नाही. कारण, सासरच्या लोकांची (बच्चन फॅमिली) भीती आहे.

यापूर्वी जेव्हा ऐश्वर्याने ‘धूम-२’ या चित्रपटात ऋतिकसोबत लिपलाॅक केले होते, तेव्हा सासरा अमिताभ बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांनी तो सीन आवडलेला नव्हता. तर करण जौहारने ऐश्वर्याला विश्वासात घेऊन सांगितले की, “आपण हा सीन चांगला शूट करू.या सीनमध्ये कुठेही तुझ्या घराच्या इभ्रतीला धक्का लागणार नाही.”

असं असलं तरी बच्चन परिवाराला हा सीन आवडला नाही. त्यांनी चित्रपटातून हा सीन काढण्यास सांगितले. पण, करणने त्यांची ही गोष्ट मान्य केली नाही. पण, सेन्साॅर बोर्डकडून त्याच्या सीनवर कात्री चालविण्यात आली. या सगळ्या घडामोडींवर रणबीरला मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.

सुरुवातीला या प्रश्नांचे उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला. पण, नंतर रणबीर म्हणाला की, “इंटिमेट सीन शूट करताना खरंतर खूप घाबरलेलो होतो. हात कापत होते. इतकंच नाही तर ऐश्वर्याच्या गालाला स्पर्श करतानाही भीती वाटत होती. तेव्हा ऐश्वर्याने ही सीन व्यवस्थित करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी विचार केला की, हीच संधी आहे. पुन्हा कधी मिळणार नाही. मग संधीचं सोनं करून टाकलं.”

रणबीरच्या या वक्तव्यामुळे बच्चन फॅमिली खूपच नाराज झाली. असं सांगितलं जातं की, रणबीर आणि ऐश्वर्याच्या हाॅट व बोल्ट सीनमुळे जितका बच्चन फॅमिलीला त्रास झाला नाही, तेवढा त्रास रणबीरच्या एका काॅमेंटमुळे झाला. तर ही किस्सा बाॅलिवुड चांगलाच गाजला. खूप दिवस चर्चेतही राहिला.

पहा व्हिडीओ : Manike mage hithe Marathi Version : व्हायरल Manike ला मराठी तडका

Back to top button