Anil Parab ईडी कार्यालयात दाखल, चौकशीत सहकार्य करण्याची दिली ग्वाही | पुढारी

Anil Parab ईडी कार्यालयात दाखल, चौकशीत सहकार्य करण्याची दिली ग्वाही

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी अनिल परब यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. त्यानुसार आज (दि.२८) ईडीसमोर हजर रहात असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.

”मी ईडी कार्यालयात आज जात आहे. माझे चौकशीत पूर्ण सहकार्य असेल. मी चुकीचे काही केलेले नाही.” असे परब (Anil Parab) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मनी लाँडरिंग प्रकरणी परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. पण पहिले समन्स बजावल्यानंतर ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यानंतर त्यांना दुसरे समन्स बजावण्यात आले. त्यात त्यांना आज मंगळ‍वारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

त्यानुसार आज अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

परिवहन विभागातील बदली, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने परब यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

या प्रकरणी परब यांनी किरीट सोमय्या यांना तब्बल १०० कोटीच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे.

सोमय्या यांच्या सततच्या बेछुट आरोपांमुळे अनिल परब यांची प्रतिमा मलिन होत असल्याचं देखील नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे.

हे ही वाचा :

Back to top button