Rahul Shelke

सीनियर मल्टीमीडिया प्रोड्यूसर सध्या पुढारी डिजिटलमध्ये सीनियर मल्टीमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत असून अर्थव्यवस्था, शेअर बाजार, आंतरराष्ट्रीय व्यापार, पर्सनल फायनान्स आणि उद्योग क्षेत्रातील बातम्या व विशेष लेखन हा माझा विशेष अभ्यासाचा विषय आहे. वाचकांपर्यंत गुंतागुंतीचे आर्थिक विषय सोप्या, अचूक आणि रंजक पद्धतीने पोहोचवण्यावर माझा भर असतो. शैक्षणिक पात्रता • बी.ए. (अर्थशास्त्र) – फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जर्नालिझम – रानडे इन्स्टिट्यूट, पुणे • एम.ए. (मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) – गरवारे महाविद्यालय, पुणे शैक्षणिक प्रवासादरम्यान वृत्तसंकलन, संपादन, डिजिटल पत्रकारिता, मल्टिमीडिया स्टोरीटेलिंग आणि जनसंपर्क यांसह पत्रकारितेच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास केला. मीडिया क्षेत्रातील अनुभव गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. या काळात लिखाण, व्हिडिओ, डिजिटल कंटेंट, सोशल मीडिया ट्रेंड्स आणि वाचकाभिमुख पत्रकारिता यांचा व्यापक अनुभव मिळाला. आर्थिक विषय सर्वसामान्य वाचकांना सहज समजेल अशा भाषेत आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारे मांडण्यावर नेहमीच भर दिला आहे. कारकिर्दीची सुरुवात इंडी जर्नल येथे ग्राउंड रिपोर्टर म्हणून केली. त्यानंतर सकाळच्या प्रिंट आवृत्तीमध्ये संपादकीय विभागात काम करण्याची संधी मिळाली. पुढे युनिक फीचर्समध्ये विविध विषयांवरील लेखनाचा अनुभव घेतला. त्यानंतर ई-सकाळमध्ये 'सकाळ मनी' विभागाची जबाबदारी सांभाळत अर्थ, गुंतवणूक, शेअर बाजार आणि पर्सनल फायनान्स विषयांवरील बातम्या व विशेष लेखांचे नियोजन आणि संपादन केले. सध्या पुढारी डिजिटलमध्ये सीनियर मल्टीमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत असून आर्थिक घडामोडी, शेअर बाजार, उद्योग, धोरणात्मक निर्णय आणि पर्सनल फायनान्स विषयांवरील दर्जेदार आणि विश्वासार्ह पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक बातमीची शहानिशा करूनच ती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर माझा भर आहे. तसेच अर्थतज्ज्ञ, बाजार विश्लेषक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधून सखोल आणि दर्जेदार लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. संपर्क: ई-मेल: rahularjunshelke207@gmail.com मोबाईल: 96737 02715
Connect:
Rahul Shelke
logo
Pudhari News
pudhari.news