लता मंगेशकर : ”मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे” | पुढारी

लता मंगेशकर : ''मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे''

पुढारी ऑनलाईन : 

”नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज ही, पहचान है
गर याद रहे
नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज ही, पहचान है
गर याद रहे”

एका गायिकेवर लिहिलेलं हे अजरामर गाणं आहे. गुलजार यांनी फक्‍त लता मंगेशकर यांच्‍यासाठी एक गाणं लिहिलं होतं. चित्रपट ‘किनारा’ (१९७७) मधलं गीत ‘नाम गुम जाएगा’ लता मंगेशकर यांचं आवडतं गाणं आहे.

२८ सप्‍टेंबर सुरकोकिळा लतायांचा आज वाढदिवस. आजच्‍या दिवशी त्‍यांची अनेक गाणी त्‍यांचे फॅन्‍स शेअर करत आहेत. परंतु, असं एक गाणं आहे की, जे लता यांचं आवडतं गाणं आहे आणि ते फक्‍त त्‍यांच्‍यासाठी लिहिण्‍यात आलं होतं.
चित्रपट किनारा (१९७७)मधलं गाणं ‘नाम गुम जाएगा’ लता यांच्‍या आवडत्‍या गाण्‍यांपैकी एक आहे.

या चित्रपटाचे निर्माते गुलजार यांनी लतादीदींसाठी गाणं लिहिलं होतं.

‘लता सुर-गाथा’चे लेखक यतींद्र मिश्र यांना गुलजार यांनी सांगितलं होतं की, ते गाणं फक्‍त लता मंगेशकर यांच्‍यासाठी लिहिलं होतं.

एका कार्यक्रमात लतादीदींनी म्‍हटलं होतं की, ‘मी स्‍वत: या गाण्‍याबद्‍दल सांगितलं तर सहगल साहब, मुकेश भैय्‍या आणि किशोर दा यांच्‍यासाठी हे सटीक होईल.’

सन १९७५ पॉलिटिकल ड्रामा चित्रपट ‘आंधी’ गुलजार यांनी दिग्‍दर्शित केला होता. चित्रपटात संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या.

या चित्रपटातील गाणं ‘तेरे बिना जिन्दगी से कोई शिकवा’ सर्वात अधिक लोकप्रिय गाण्‍यांपैकी एक आहे.

१९७२ मध्‍ये आलेला चित्रपट मनोज कुमार दिग्‍दर्शित चित्रपट ‘शोर’मधलं गाणं ‘एक प्यार का नगमा है’ लता मंगेशकर यांच्‍या हिट गाण्‍यांपैकी एक आहे.

अभिनेत्री रति अग्निहोत्री आणि कमल हासन यांचा चित्रपट ‘एक दूजे के लिए’मधील गाणे ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’, लता मंगेशकर आणि अनूप जलोटा यांनी गायलं होतं.

अभिनेता राज बब्बर आणि स्मिता पाटील, अमृता सिंह यांचा चित्रपट ‘वारिस’ १९८८ मध्‍ये आला होता.

या चित्रपटातील गाणं ‘मेरे प्यार की उमर हो इतनी सनम’, लतादीदींच्‍या सुपरहिट गाण्‍यांपैकी एक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar)

Back to top button