BB Marathi -3 : महेश मांजरेकर यांच्या छगन भुजबळ लूकची चर्चा | पुढारी

BB Marathi -3 : महेश मांजरेकर यांच्या छगन भुजबळ लूकची चर्चा

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा त्या शोमदील कलाकारांमुळे चर्चेत आला होता. पण, आता पहिल्यांदाच या शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्यामुळे शो चर्चेत आलाय. या शोचे तिसरे सीझन ३ पर्व सुरु आहे. या शोचे सूत्रसंचालन करणारे अभिनेते महेश मांजरेकर यांची चर्चा होतेय. या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. .या प्रोमोमध्ये मांजरेकर एक वेगळ्या लूकमध्ये दिसताहेत.

खरंतरं, त्यांच्या हा लूक पाहून नेटकऱ्यांनी त्यांना सेम टू सेम छगन भूजबळ अशी कमेंट दिलीय. मांजरेकर यांची तुलना त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी केलीय.

मांजरेकरांच्या व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये ते स्पर्धक मीरा जगन्नाथला खडसावताना दिसताहेत.

मीरीने कशाचीही पर्वा न करता पहिल्या दिवसापासून घरात वाद घालायला सुरुवात केलीय.

तिचे भांडण काही थांबायला तयार नाही. त्यामुळे मीरा अनेक ठिकाणी चुकतेय असे सांगत मांजरेकर तिला सुनावताना दिसताहेत. पण, एकायला तयार नसलेल्या मीराला मांजरेकरांनी “तू आधी ऐकायला शिक” म्हटले.

या प्रोमोमध्ये नेटकऱ्यांनी मांजरेकरांना कमेंट दिली. त्यांची तुलना ही छगन भुजबळ यांच्याशी केली आहे. एक नेटकरी म्हणाला- मला वाटलं भुजबळचं आहेत की काय. दुसरा नेटकरी म्हणाला- मला वाटलं छगन भुजबळ इकडे कसे काय? आणखी एक नेटकरी म्हणाला, “Same to same छगन भुजबळ साहेब.”

तर आणखी एकाने म्हटलंय- मला वाटले छगन भुजबळच आलेत होस्ट म्हणून!.

हेही वाचलं का ? 

Back to top button