हिम्मत असेल तर ठाकरे सरकार व पवारसाहेबांनी अडवून दाखवावे : खासदार सोमय्या | पुढारी

हिम्मत असेल तर ठाकरे सरकार व पवारसाहेबांनी अडवून दाखवावे : खासदार सोमय्या

उंब्रज; पुढारी वृत्तसेवा: ठाकरे सरकारने स्वत:ची इज्जत वाचविण्यासाठी बंदी आदेश उठविला असला तरी, या बंदीची पर्वा नाही असे म्हणत, हिम्मत असेल तर ठाकरे सरकार व  पवारसाहेबांनी मला अडवून दाखवावे, असे आव्‍हान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उंब्रज येथे दिले.

साताराहून  कोल्हापूरकडे जात असताना उंब्रज (ता. कराड) येथे भाजपचे पदाधिकारी यांनी किरीट सोमय्या यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, कराड उत्तर तालुकाध्यक्ष महेशकुमार जाधव, जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डुबल,  ॲड. विशाल शेजवळ यांनी स्वागत केले.

यावेळी खासदार सोमय्या म्हणाले, कोल्हापूर येथे आंबामाताचे दर्शन व आशीर्वाद घेणार आहे. भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करण्यासाठी अंबामातेने शक्ती द्यावी, अशी प्रार्थना करणार आहे. तसेच माझ्‍यावर लादण्‍यात आलेल्‍या बंदीला मी भीक घालत नाही.

मी त्यांना चॅलेंज केले होते की, ठाकरे सरकार व  पवार साहेब यांनी हिम्मत असेल तर मला आडवून दाखवावे. बंदी असते की नाही हे सरकारला माहित आहे. कारण जनता किरीट सोमय्या यांच्या पाठीमागे आहे, असेही ते म्‍हणाले. यानंतर   सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले. या वेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.

रामकृष्ण वेताळ, सागर शिवदास, अनिकेत जाधव, स्वप्नील ढवळे, महेशबुवा जाधव, सौ.गुणवंत मॅडम, शंकर शेजवळ, हरीष पाटील, गणेश इंजेकर, बापू बैले, शहाजी मोहिते, दत्तात्रय साळुंखे, सुनील जाधव, संजय पाटील, सूरज शेळके, निलेश भंडारे,अक्षय चव्हाण यांच्‍यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमय्या यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने उंब्रज पोलिस यासह शीघ्र कृतीदलाचे पोलिस पथक तैनात करण्यात आले होते. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button