Shivani Surve : ‘वाळवी’नंतर शिवानीचे हे सिनेमा येणार भेटीला | पुढारी

Shivani Surve : 'वाळवी'नंतर शिवानीचे हे सिनेमा येणार भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क :  वाळवी चित्रपटाने 2023 ची सुरुवात सकारात्‍मक झाली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरतो आहे. यात अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या भूमिकेचेही कौतुक होतंय. (Shivani Surve) आपल्याला हवं ते साध्य करणारी, त्यासाठी काहीही करायला तयार असलेल्या मुलीच्या व्यक्तिरेखेत शिवानी यात दिसून येत आहे. सुंदर लूक्स आणि सहज अभिनय  कॉम्बिनेशन या निमित्ताने पाहायला मिळत आहे. (Shivani Surve)

यंदा शिवानीकडून चाहत्यांना आणखी वेगवेगळ्या सिनेमांची भेट मिळणार आहे. त्या बद्दल शिवानी म्हणते , ‘’2022 हे वर्ष खूप बिझी गेलं. 2-3 चित्रपटांचं शूटिंग मी केलं. तर आता हे नवीन वर्ष माझ्यासाठी नवनवीन संधीचं वर्ष आहे, असं मी समजते. कारण गेल्या दोन वर्षात जी मी कामं केली होती, ती आता प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या प्रत्येक सिनेमात मी वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्याचं समाधान आहे.

वाळवी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे ही खूप आनंदाची बाब आहे. त्या शिवाय आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा मराठी कन्नडा भाषेत शूट झालेला आणि पॅन इंडिया प्रदर्शित होणारा सिनेमाही माझा यंदा प्रदर्शित होईल.’’
आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेमध्ये शिवानी आत्तापर्यत न दिसलेल्या भूमिकेत आहे. शिवानी यात नक्षलवाद्याच्या भूमिका साकारणार आहे.  यासाठी शिवानीने खडतर मेहनत घेतली आहे. याबद्दल शिवानी म्हणते,’’ कन्नड शिकणं असेल किंवा फिजिकल ट्रेनिंग या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. यामुळे या सिनेमासाठी मी सर्वतोपरी माझ्या कम्फर्टझोनच्या बाहेर काम केलं आहे.’’

महेश मांजेकर यांच्या वीर दौडले सात या सिनेमात ऐतिहासीक भूमिका शिवानी  साकारत आहे. ती प्रथमच ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. याबाबत शिवानी सांगते, ‘’महेश मांजरेकरांचा एवढा मोठा प्रोजेक्ट आणि त्याचा भाग असल्या आनंद आहे. त्‍यांच्‍याकडून  खूप शिकायला मिळतं. त्यांनी सांगितलं तसं केलं तर तुम्हाला जास्त काही करायला लागत नाही. ‘’

हेही वाचा : 

Back to top button