Rakhi Sawant : राखी सावंतच्या मदतीला मुकेश अंबानी धावले; आईच्या उपचारासाठी केली आर्थिक मदत | पुढारी

Rakhi Sawant : राखी सावंतच्या मदतीला मुकेश अंबानी धावले; आईच्या उपचारासाठी केली आर्थिक मदत

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आता आदिलसोबत तिने लग्न केले आहे. वैवाहिक जीवनात आतापर्यंत अनेक अडथळे येत असतानाच राखीला आईच्या आजारपणामुळे टेंशन आले आहे. राखीच्या आईला कर्करोगानंतर ब्रेन ट्युमर झाला आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी आईच्या उपचारात मदत करत असल्याची माहिती राखीने दिली.

या बाबत माहिती देताना राखी सावंत राखी (Rakhi Sawant) म्हणाली की, “माझी आई कोणालाच ओळखू शकत नाही. तिला नीट जेवताही येत नाही. तिच्या अर्ध्याहून अधिक शरीराला अर्धांगवायू झाला आहे. उद्योगपती अंबानी हे माझ्या आईच्या उपचारात मदत करत आहेत. रुग्णालयातील अधिक महागडे उपचार कमी खर्चात करण्यासाठी त्यांनी मला मदत केली आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानते.”

राखीची आई दोन महिन्यांपासून रुग्णालयात दाखल आहे. राखीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर फॅन्स तिच्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘धीर धरा राखी, सर्व काही ठीक होईल.’ त्याचवेळी आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘आई ही आई असते, ती कोणीही असो, काळजी करू नका, ती लवकरच बरी होईल.’

दरम्यान, कधी नकार, कधी होकार, असे करत अखेर आदिलने राखीसोबत लग्न केल्याचे मान्य केले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांने फटकारल्यानंतर आदिलने ही कबुली दिल्याचे राखींने सांगितले. राखीने सांगितले की, तिला सलमान खान यांचा फोन आला होता. सलमानने आदिलला सांगितले की, सर्व गोष्टी स्पष्ट करून जे आहे, त्याचा स्वीकार कर. तुम्ही लग्न केले असेल, तर तसे सांग, नसेल तर नाही म्हणून सांग, पण लोकांसमोर काही असेल, ते स्पष्ट कर. त्यानंतर आदिलने लग्नाची कबुली दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button