कार्तिकचा ‘शहजादा’ ‘पठाण’वर भारी | पुढारी

कार्तिकचा ‘शहजादा’ ‘पठाण’वर भारी

शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून खूपच चर्चा सुरू आहे. अखेर 10 जानेवारी रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच चित्रपटाच्या ट्रेलरने यू ट्यूबवर काही लाख व्ह्यूज मिळवले, पण आता कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ या चित्रपटाने ‘पठाण’ला याबाबतीत मागे टाकले आहे. ‘पठाण’प्रमाणेच कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. 10 फेब—ुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि यू ट्यूब वरील व्यवसाय बाबतीत या चित्रपटाने ‘पठाण’लाही मागे टाकले आहे. ‘पठाण’ या चित्रपटाच्या ट्रेलरला आतापर्यंत 48 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत तर ‘शहजादा’ या चित्रपटाच्या ट्रेलरला सर्व प्लॅटफॉर्म्सवरून 85 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. याबद्दल कार्तिक आर्यनने एक टि्वट करत आनंद व्यक्त केला.

Back to top button