तेजस्विनीला लग्न पडले महागात | पुढारी

तेजस्विनीला लग्न पडले महागात

मराठमोळी तेजस्विनी पंडित नामांकित अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ओळखली जाते. ताज्या मुलाखतीत तिने स्वतःच्या जीवनातील अनेक गोष्टींवर निर्भीडपणे मते मांडली आहेत. ती म्हणते, वेळेनुसार स्वत:ला अपडेट करण्यासाठी विविध गोष्टी बघण्याची गरज आहे. रोखठोक स्वभावामुळे माझ्यावर प्रचंड टीका होत असली, तरी माझ्या प्रोजेक्टमध्ये काम केलेल्या प्रत्येकाला मी वेळच्या वेळी मानधन दिले आहे. कारण, या मनोरंजनसृष्टीत मानधनावरून प्रचंड रडारड होत असते. माणसाकडे बिल गेटस्सारखा पैसा हवा. फरहान अख्तरसारखा आवाज पाहिजे. रणदीप हुड्डा तर मला खूप आवडतो.

त्यामुळे ही मंडळी समोर येताच माझी नजर हटत नाही. दरम्यान, तेजस्विनीला तिचे लग्न प्रचंड महागात पडले आहे. लग्नाचे कारण देत दोन सिनेमांमधून तिला बाहेरचा दरवाजा दाखवण्यात आला आहे. ‘दुनियादारी’ सिनेमातील शिरीन ही भूमिका तेजस्विनी साकारणार होती, तसेच ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या सिनेमात ती नाना पाटेकरांसोबत झळकणार होती.

Back to top button