Sensex Nifty Today | सेन्सेक्स, निफ्टी तेजीत, IT शेअर्स फोकसमध्ये, काय कारण? | पुढारी

Sensex Nifty Today | सेन्सेक्स, निफ्टी तेजीत, IT शेअर्स फोकसमध्ये, काय कारण?

पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारातील तेजीचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारानेही आज गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशी तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० हून अधिक ७१,९४० वर पोहोचला. त्यानंतर सकाळी १०.१५ च्या सुमारास तो ७१,८०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी २१,६६० वर होता. (Sensex Nifty Today)

सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, पॉ‍वर ग्रिड, रिलायन्स, एनटीपीसी, टेक महिंद्रा हे सर्वाधिक वाढले. तर इन्फोसिस, नेस्ले इंडिया, सन फार्मा या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

निफ्टीवर हिरो मोटोकॉर्प, इंडसइंड बँक, बजाज ऑटो, पॉवर ग्रिड, बीपीसीएल हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर डॉ. रेड्डीज, इन्फोसिस, ग्रासीम हे शेअर्स घसरले आहेत.

आजच्या व्यवहारात IT शेअर्स आज फोकसमध्ये राहतील. कारण टीसीएस (TCS) आणि इन्फोसिस (Infosys) बाजार बंद झाल्यानंतर तिमाही निकालांची माहिती देणार आहेत.

आयकर विभागाला १ हजार कोटींची बेहिशेबी रोख विक्री आढळल्याच्या वृत्तांमुळे पॉलिकॅब इंडियाचा शेअर्स १० टक्क्यांच्या लोअर सर्किटसह खुला झाला होता. (Sensex Nifty Today)

आशियाई बाजारात आज तेजीचे वातावरण आहे. जपानचा निक्केई आज १.९ टक्क्यांनी वाढून ३५,०८५ वर होता. ब्लू-चिप सीएसआय ३०० निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात वाढला होता, तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.५ टक्क्यांनी वाढला आहे.

 हे ही वाचा :

Back to top button