भारतीयांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. क्रेडिट कार्ड कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकता येत असल्यामुळे वापरकर्त्याची क्रयशक्तीही वाढते. कार्ड वापरून तुम्ही सहज काहीही खरेदी करू शकता. मात्र, वेळेवर बिल न भरल्यास समस्या निर्माण होते. जास्त व्याजाचा भुर्दंड आणि क्रेडिट स्कोअरचे नुकसान टाळण्यासाठी क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरली पाहिजेत. ( Credit Card )
संबंधित बातम्या
क्रेडिट कार्ड बिल तयार होते, तेव्हा विलंब शुल्क टाळण्यासाठी दोन पर्याय असतात. एकतर तुम्ही खर्च केलेल्या रकमेची परतफेड करा किंवा किमान रक्कम जमा करा.
बिल जास्त होते तेव्हा तुम्ही ती रक्कम ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकता. देय रक्कम लहान ईएमआयमध्ये विभागली जाते. आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि सोयीनुसार पेमेंट करण्यासाठी हा पर्याय वापरला जातो.
अनेकदा व्यापार्यांमार्फत उत्पादन खरेदी करताना तुम्हाला 'नो कॉस्ट ईएमआय' निवडण्याचा पर्याय दिला जातो. हा पर्याय आकर्षक आहे. कारण कमी ईएमआयमध्ये मोठी रक्कम भरता येते. या पर्यायाचा कालावधी तीन महिने ते 12 महिने किंवा त्याहूनही अधिक असू शकतो. तथापि, यामागे अनेक शुल्क आणि अतिरिक्त खर्च आकारले जात असल्यामुळे आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
ईएमआयमध्ये पैसे भरणारी व्यक्ती डीफॉल्ट होण्याची शक्यता कमी असते. कारण यामध्ये आपल्या उत्पन्नानुसार कार्यकाळ निवडता येतो आणि व्याजासह रक्कम परत करू शकतो. परंतु, कार्यकाळ जितका जास्त असेल तितके तुमचे कर्ज व्याजासह परतफेड करण्याची जबाबदारी जास्त असेल. क्रेडिट कार्डच्या ईएमआयवरील व्याज बहुतेकदा 15 ते 24 टक्के किंवा त्याहून अधिक असते.
कोणत्याही कागदपत्रांशिवाय तुमची देय रक्कम ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकता. अनेक बँका किंवा व्यापारी तुम्हाला खरेदीच्या वेळी हा पर्याय देतात.
कारण ईएमआयमध्ये पैसे भरण्याचा पर्याय निवडला तरी क्रेडिट मर्यादा संपूर्ण रकमेसाठी ब्लॉक केली जाते. ईएमआयमध्ये बिल भरत गेल्यानंतर ती वाढते. त्यामुळे तुमच्या क्रेडिट मर्यादेवर लक्ष ठेवा आणि तुमची देय रक्कम पूर्ण होईपर्यंत मोठी खरेदी करणे टाळा.
वास्तविक, तज्ज्ञांच्या मते तुमचा क्रेडिट कार्ड वापर जास्तीत जास्त 30 टक्के असावा आणि ते जितके कमी असेल तितके ते तुमच्या क्रेडिट स्कोअरसाठी चांगले आहे. तथापि, जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा हा नियम पाळणे अवघड ठरते. वैद्यकीय, शिक्षण, विवाह इत्यादी आपत्कालीन परिस्थिती किंवा गरजांमुळे क्रेडिट कार्ड बिल वाढू शकते; परंतु विलंब न करता ते परत करणे योग्य ठरते.