नाशिक : वादळी वाऱ्याच्या पावसामुळे ग्रामीण भागात बत्तीगुल

वणी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडताच काही ठिकाणी विजेचे खांब वाकले काही पडले. (छाया- अनिल गांगुर्डे )
वणी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडताच काही ठिकाणी विजेचे खांब वाकले काही पडले. (छाया- अनिल गांगुर्डे )

वणी, जि. नाशिक – वणीसह येथील ग्रामीण भागात गुरुवारी (दि.१६) दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. काही भागात वादळामुळे विजेच्या तारा तुटल्याने दिडोंरी वणी विज वाहिनी नादुरूस्त झाली आहे. परिणामी येथील ग्रामीण भागात शुक्रवार (दि.१७) रोजी बत्तीगुल होऊन नागरिकांना ऐन उन्हाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागले. तर वणी शहराचा विज पुरवठा बारा तास खंडीत झाला.

वीजपुरवठा खंडीत झाल्याने वणी शहरातील नागरिक ऐन उन्हाळ्यात उकाड्याने हैराण झाले. दिडोंरी तालुक्यात काही भागात वादळी वा-यामुळे काही ठिकाणी झाडे पडली. तर काही ठिकाणी विजेच्या तारांवर झाडाच्या फांद्या पडल्याने विज पुरवठा खंडित झाला. दिडोंरी सबस्टेशन येथुन ३३ केव्ही पुरवठा विज वाहिनीवर झाडे कोलमडली. तर वलखेड शिवारात नदीच्या बाजुला विज वाहिनीवर झाडाच्या फांद्या तुटून पडल्यामुळे विज पुरवठा खंडित झाला. वादळी वारा व पावसामुळे विज कर्मचाऱ्यांना काम करणे शक्य नव्हते. विज वितरण कंपणीच्या कर्मचा-यांची मोठी दमछाक झाली. शुक्रवार (दि.१७) रोजी सकाळी तुटलेल्या तारा शोधून विज पुरवठा सुरळीत करण्यात आला. दोन दिवसापूर्वी वणी पिंपळगाव रस्त्यावर असलेल्या पारेगांव फाट्याच्या परिसरात काही विजेचे खांब जमिनीवर पडल्याने विज पुरवठा खंडीत झाला. सामाजिक कार्यकर्ते संदिप तुपलोंढे यांनी याबाबत पाठपुरावा केला.

वादळी वाऱ्यासह पाऊस थांबल्यानंतर विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आलेले विज महावितरण कंपनीचे कर्मचारी
वादळी वाऱ्यासह पाऊस थांबल्यानंतर विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आलेले विज महावितरण कंपनीचे कर्मचारी

शुक्रवार (दि.१७) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वणीत वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिंडोरी येथून वणीकडे प्रवाहित होणारी विजवाहिनी नादुरूस्त झाल्या. वणी येथील विज पुरवठा खंडीत झाल्याने ऐन उन्हाळ्यात रात्री नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागले. ग्रामीण भागातील विजवाहिन्या अगदी जुनाट झाल्या असल्याने वारंवार विजप्रवाहात बिघाड होतो आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी विज प्रवाह खंडीत होतो आहे. याबाबत त्वरीत उपाययोजना आखणे आवश्यक झाले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news