Swiss Bank Account Info.: स्विस बँकेतील भारतीयांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पुन्हा उघड | पुढारी

Swiss Bank Account Info.: स्विस बँकेतील भारतीयांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पुन्हा उघड

पुढारी ऑनलाईन डेस्क: स्वित्झर्लंडने भारतासाेबत मोठ्या आर्थिक माहितीची देवाणघेवाण केली आहे. स्विस बँकेतील भारतीय नागरिकांच्या खात्यांसंदर्भातील व्यवहारांची माहिती देवाणघेवाण करण्याची ही पाचवी वेळ आहे. दरम्यान, भारतीय अधिकाऱ्यांनी देखील स्वित्झर्लंडने काही व्यक्ती, कॉर्पोरेट आणि ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची माहिती शेअर केल्याचे म्हणत या घटनेची पुष्टी केली आहे, असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. (Swiss Bank Account Info.)

वार्षिक स्वयंचलित माहिती देवाणघेवाणचा भाग म्हणून स्वित्झर्लंडने सुमारे १०४ देशांबराेबर ३६ लाख आर्थिक खात्यांचे तपशील उघड केले आहेत. स्वित्झर्लंडने स्विस बँकेतील खात्यातील आर्थिक व्यवहार संदर्भातील माहिती १०४ देशांसोबत शेअर केली आहे. यामध्ये भारतातील काही व्यक्ती, कॉर्पोरेट कंपण्या आणि ट्रस्टशी संबंधित अनेक खात्यांच्या शेकडो आर्थिक व्यवहारांची माहितीचा देखील समावेश आहे. (Swiss Bank Account Info.)

‘पीटीआय’च्या अहवालानुसार, स्वित्झर्लंडने उघड केलेल्या स्विस बँकेतील माहितीमध्ये ओळख, खाते आणि आर्थिक माहिती, नाव, पत्ता, राहण्याचा देश आणि कर ओळख क्रमांक, तसेच अहवाल देणाऱ्या वित्तीय संस्था, खाते शिल्लक आणि भांडवली उत्पन्न याचा समावेश आहे. (Swiss Bank Account Info.)

हेही वाचा :

Back to top button