सोलापूर : आहेरगाव येथे अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

सोलापूर : आहेरगाव येथे अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

टेंभुर्णी; पुढारी वृत्तसेवा : माढा तालुक्यातील आहेरगाव येथे अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२२) दुपारी ४.३० वाजता घडली. पांडुरंग किसन जगताप (वय ५७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आहेरगाव येथे बुधवारी सायकाळच्या सुमारास ढग दाटून आले होते. यावेळी मेघगर्जनेसह विजा चमकू लागल्या. अशातच शेतकरी पांडुरंग जगताप हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ टेंभुर्णी येथे उपचारास दाखल करण्यात आले.मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पांडुरंग जगताप यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा ना.उदय सामंत यांचे शासकीय स्वीय सहाय्यक आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button