रत्नागिरी : खेड येथील कारखान्याच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू | पुढारी

रत्नागिरी : खेड येथील कारखान्याच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

खेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर्स या कारखान्याच्या ३० फूट उंचीच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२२) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. उमेश चौरसिया (वय ३० रा.बिहार) असे या कामगाराचे नाव आहे.

खेड येथील पुष्कर केमिकल अँड फर्टीलायझर्स या रासायनिक कारखान्याच्या छत्राचे पत्रे बदलण्याचे काम आज सुरू होते. यावेळी सलीम खान या ठेकेदाराबरोबर उमेश काम करत होता. ३० फुट उंचीवर काम सुरू असल्याने तोल जाऊन खाली कोसळला. तत्काळ त्याला रतनबाई घरडा हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह कळबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

 

 हेही वाचा :

 

Back to top button