विराटप्रमाणे मी बाऊन्सरला ‘पुल शॉट’ने उत्तर देतो : परराष्‍ट्र मंत्री असे का म्‍हणाले? | पुढारी

विराटप्रमाणे मी बाऊन्सरला 'पुल शॉट'ने उत्तर देतो : परराष्‍ट्र मंत्री असे का म्‍हणाले?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात नुकत्याच झालेल्या हिंसाचारावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ( S jayshankar ) यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. मी कुठेतरी जात होतो आणि नुकतेच एका विमानातून उतरलो होतो आणि मी व्हिडिओमध्ये पाहिले की लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर एक व्यक्ती ध्वज खाली करण्याचा प्रयत्न करत आहे. हे मला खूप त्रास देत होते, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

एका यूट्यूब पॉडकास्टवर मुलाखत देताना परराष्‍ट्र मंत्री जयशंकर म्‍हणाले की, मी 45 वर्षांहून अधिक काळ मुत्सद्दी म्हणून काम करत आहे. मात्र परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर माझा दृष्टिकोनही बदलला आहे. आता राजकीय लोकांना कसे उत्तर द्यायचे ते मला कळते.
आता कोहलीसारखा पुल शॉट मारतो.

राजकारणात कुणी जसे वागेल त्याला त्‍याच भाषेत उत्तर देतो

पूर्वी मी मुत्सद्द्याप्रमाणे शांतता राखत असे; पण आता राजकारणात कुणी जसे वागेल त्याला त्‍याच भाषेत उत्तर देतो. जर कोणी माझ्याशी चांगले वागले तर मी त्याच्याशी त्याच पद्धतीने बोलतो. गेल्या काही वर्षांत माझ्यावर अनेक टोमणे मारले जात आहेत. मीही विराट कोहलीप्रमाणे बाऊन्सरला पुल शॉटमध्ये उत्तर देत आहे, असेही एस. जयशंकर यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

 

Back to top button