Ameesha Patel : चेक बाऊन्स प्रकरणी अमिषा पटेलला सशर्त जामीन | पुढारी

Ameesha Patel : चेक बाऊन्स प्रकरणी अमिषा पटेलला सशर्त जामीन

पुढारी ऑनलाइन डेस्क : Ameesha Patel : चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेत्री अमिषा पटेलने शनिवारी रांची सिव्हिल न्यायालयासमोर हजर झाली आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर न्यायालयाने तिला सशर्त जामीन मंजूर केला. तिला 21 जून रोजी शारीरिकरित्या कोर्टासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. वाचा काय आहे प्रकरण

अमिषा पटेल आणि लव्हली वर्ल्ड एंटरटेनमेंटचे मालक अजय कुमार सिंग यांच्यात हा वाद सुरू आहे. 2018 मध्ये दोघांची रांची येथील हरमू ग्राउंडवर एका कार्यक्रमात भेट झाली होती. यावेळी अमिषा पटेलने सिंग यांना एका चित्रपटासाठी वित्तपुरवठा करण्याची चर्चा केली होती. सिंग यांनी चित्रपट निर्मिती प्रकल्पात गुंतवणूक केली. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे सिंग यांनी अमिषाकडे पैसे परत करण्याची मागणी केली. Ameesha Patel

अमिषाने सिंग यांना चेकद्वारे 2.50 कोटी रुपये परत केले पण चेक बाऊन्स झाला. त्यामुळे सिंग यांनी अमिषा पटेलवर दावा दाखल केला. या प्रकरणात अमिषा पटेल शनिवारी कोर्टासमोर हजर झाली. नोव्हेंबर 2021 मध्ये, अमीषा अशाच कारणामुळे चर्चेत आली होती जेव्हा तिचा UTF टेलिफिल्म्सचा 32.25 लाख रुपयांचा चेक बाऊन्स झाला होता.

अमिषा पटेलचा सध्या गदर 2 प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना, हे प्रकरण समोर आल्याने जास्त चर्चा होत आहे.

हे ही वाचा :

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, चित्रपटात करणार ‘हा’ बदल

मनोरंजन : नव्या पिढीचं नवं रामायण

Back to top button