Adipurush : ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, चित्रपटात करणार ‘हा’ बदल

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, चित्रपटात करणार ‘हा’ बदल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बहुचर्चित आदिपुरुष ( Adipurush ) चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाच्‍या प्रदर्शनानंतर यातील सादरीकरणावरुन अनेक वाद निर्माण झाले आहेत. संवादावरुन सोशल मीडियावर हा चित्रपट प्रचंड ट्रोल होत आहे. आता याबाबत निर्मात्‍यांनी मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी चित्रपटातून काही संवाद काढून टाकले जातील, असे आश्वासन दिले आहे.

Adipurush : मनोज मुंतशीर यांनी केला खुलासा…

मनोज मुनताशीर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्‍हटलं आहे की, 'रामकथेतून पहिला धडा शिकता येतो तो म्हणजे प्रत्येक भावनेचा आदर करणे. बरोबर की चूक, काळ बदलतो, भावना राहते. मी आदिपुरुषमध्ये चार हजारांहून अधिक संवाद लिहिले, मात्र केवळ पाच ओळींवर काहींच्‍या भावना दुखावल्या. माझ्याच काहींनी सोशल मीडियावर माझ्यासाठी असभ्य शब्द लिहिले. मी विचार करत राहिलो, मतभेद असू शकतात, पण माझ्याबद्‍दल लिहणार्‍यांच्‍या मनात अचानक एवढी कडवटपणा कुठून आला की ते प्रत्येक आईला आपली आई मानणाऱ्या श्रीरामाला पाहायलाच विसरले.

'तुम्ही 'जय श्री राम', 'शिवोहम', 'राम सिया राम' गाणे ऐकले नाही का? आदिपुरुषातील ही स्तुतीही माझ्या लेखणीतूनच जन्माला आली आहे. मी 'तेरी मिट्टी' आणि 'देश मेरे'ही लिहिले आहे. आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो तर सनातनचा पराभव होईल. सनातन सेवेसाठी आम्ही आदिपुरुष निर्माण केले आहेत, जे तुम्ही मोठ्या संख्येने पहात आहात आणि मला खात्री आहे की तुम्हाला भविष्यातही ते दिसेल, असेही त्‍यांनी म्‍हटलं आहे. तसेच चित्रपटातून काही संवाद काढून टाकले जातील, असे आश्वासनही त्‍यांनी ट्विटमधून दिले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news