‘गो फर्स्ट’ च्या दिवाळखोरी कार्यवाहीवर लवादाचे शिक्कामोर्तब | पुढारी

'गो फर्स्ट' च्या दिवाळखोरी कार्यवाहीवर लवादाचे शिक्कामोर्तब

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : खासगी क्षेत्रातील हवाई वाहतूक कंपनी ‘गो फर्स्ट’ चा दिवाळखोरी संदर्भातील अर्ज राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने काही दिवसांपूर्वी स्वीकारला होता. याला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेल्या याचिका राष्ट्रीय कंपनी अपिलिय प्राधिकरणाने [एनसीएलएटी] आज (दि.२२) फेटाळून लावल्या.

‘गो फर्स्ट’ ला भाड्याने विमाने दिलेल्या अनेक कंपन्यांनी दिवाळखोरी अर्जाला विरोध केलेला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कंपन्यांनी ‘एनसीएलएटी’ मध्ये धाव घेत ‘गो फर्स्ट’ चा दिवाळखोर कार्यवाही अर्ज रद्दबातल करावा, अशी विनंती केली होती. तथापि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा अर्ज फेटाळून लावला. एनसीएलएटीकडे ज्या कंपन्यांनी याचिका दाखल केल्या आहेत, त्यात एसएमबीसी एविएशन कॅपिटल लि., जीवाल एविएशन, एसएफव्ही एअरक्राफ्ट होल्डिंग्ज अँड इंजिन लिझिंग फायनान्स बीव्ही यांचा समावेश आहे. वरील कंपन्यांनी 22 विमाने गो फर्स्टला विमाने भाड्याने दिली आहेत.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button