Indian Army : भारतीय सेना होणार अत्याधुनिक; 2023 मध्ये ‘हे’ मोठे बदल; काश्मीर-लद्दाख सारख्या घटनांना बसणार आळा | पुढारी

Indian Army : भारतीय सेना होणार अत्याधुनिक; 2023 मध्ये 'हे' मोठे बदल; काश्मीर-लद्दाख सारख्या घटनांना बसणार आळा

पुढारी ऑनलाइन डेस्क : Indian Army : जागतिक पातळीवर सध्या सातत्याने बदलते वातावरण आहे. संरक्षणाच्या दृष्टीने भारतासमोर नवनवीन आव्हाने आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याचे अत्याधुनिकरण करण्याची तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत भारतीय सैन्य विविध प्रोजेक्टवर काम करत आहेत. हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्य आधुनिक आणि आणखी जास्त मारक होणार आहे. 2023 मध्ये भारतीय सैन्यात तंत्रज्ञानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये युद्धक्षेत्रातील पाळत ठेवणे प्रणाली सुधारणे, प्रकल्प ई-सिट्रेप, प्रकल्प आवाजरान आणि प्रकल्प अनुमान इत्यादींचा समावेश आहे.

एका कार्यक्रमादरम्यान लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी लष्करात करण्यात येत असलेल्या तांत्रिक बदलांची माहिती दिली. यामुळे सैन्य अधिक तंत्रज्ञानावर आधारित, स्वावलंबी, युद्धासाठी सज्ज होईल, असे ते म्हणाले. यासोबतच भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठीही ते उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

2023 ठरणार बदलाचे वर्ष; या मोठ्या प्रोजेक्टवर काम

भारतीय सैन्याला आधुनिक बनवण्यासाठी तयारी सुरू आहे. त्या दृष्टीने 2023 हे तंत्रज्ञानाबाबत मोठ्या बदलांचे वर्ष ठरणार आहे. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी आणि सैन्याला नवीन तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यासाठी वैविध्यपूर्ण मोठ्या प्रोजेक्टवर काम केले जात आहे. त्यामध्ये प्रोजेक्ट संजय सर्वात महत्वाचे आहे. याशिवाय सामा, ई सिट्रेप, प्रोजेक्ट अवगत आणि प्रोजेक्ट अनुमान हे सर्व प्रोजेक्ट सैन्यात लवकरात लवाकर समाविष्ट करण्याची तयारी सुरू आहे.

Indian Army : काय आहे प्रोजेक्ट संजयचे महत्व

प्रोजेक्ट संजय हे भारतीय सैन्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. या प्रोजेक्टमुळे भारतीय सैन्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत मोठ्या संख्येने सेन्सर्स एकत्रित केले जातील आणि फील्ड निर्मितीसाठी पाळत ठेवणे केंद्रे स्थापन केली जातील. याशिवाय, ते आर्टिलरी कॉम्बॅट कमांड आणि कंट्रोल अँड कम्युनिकेशन सिस्टम (ACCCS) शी जोडले जातील. त्यामुळे कमांडर आणि इतर कर्मचारी अधिक चांगल्या पद्धतीने लष्कराची एकात्मिक निगराणी करू शकतील.Indian Army

या प्रकल्पाच्या चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या असून देशाच्या विविध भागात यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत त्याचा लष्करात समावेश केला जाईल, असे मानले जात आहे. बीईएल गाझियाबादने हा प्रकल्प तयार केला आहे.

Indian Army : या प्रोजेक्टवरही काम सुरू

प्रोजेक्ट संजय व्यतिरिक्त सैन्य सामा (SAMA – Situational Awareness Module for the Army), ई-सिट्रेप (एंटरप्राइझ-क्लास GIS प्लॅटफॉर्मवर परिस्थितीचा अहवाल), प्रकल्प अवगत’ (लष्कराची स्वतःची गती शक्ती) आणि प्रकल्प अनुमान यांचा देखील लवकरच लष्करात समावेश करण्याची तयारी केली जात आहे. यापैकी सामा प्रोजेक्ट अंतर्गत लष्कराच्या लढाऊ माहिती निर्णय समर्थन प्रणालीचा समावेश आहे. यामुळे सैन्याची रणांगणातील परिस्थितीबद्दल अधिक जागरूकता आणि समज वाढेल, ज्यामुळे रणांगणातील नुकसान कमी होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, SAMA प्रकल्प कॉर्पस झोनमध्ये या महिन्यात फील्ड व्हेरिफिकेशनसाठी सुरू केला जाईल. (Indian Army)

हे ही वाचा :

J&K News : बारामुल्लात सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक आतंकवादी ठार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जम्मूच्या राजौरी दौऱ्यावर; सुरक्षा परिस्थितीचा घेणार आढावा

Back to top button