J&K News : बारामुल्लात सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक आतंकवादी ठार

J&K News
J&K News

पुढारी ऑनलाइन डेस्क : J&K News :जम्मू काश्मीरच्या राजौरीच्या कंडी जंगलात आणि बारामूल्ला जिल्ह्यातील करहामा कुंजर भागात सुरक्षा दल आणि दहशदतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. तर दूसरीकडे बारामूलाच्या करहामा कुंजर भागात सुरक्षा दलाने एका आतंकवाद्याला ठार केले आहे. तर जंगलात लपलेल्या आणखी आतंकवाद्यांचा शोध सुरू आहे. काल शुक्रवारी (दि.4) याच भागात आतंकवाद्यांच्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते.

राजौरी आणि बारामुल्लात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. आणखी एक दहशतवादी गंभीर जखमी झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत केलेल्या जप्तींमध्ये 1 AK56, 4 Mags AK, 56 AK च्या राउंड, 1x9mm पिस्तूल विथ मॅग, 3 ग्रेनेड आणि 1 दारूगोळा पाउच यांचा समावेश आहे. दहशतवाद्याची ओळख पटवली जात आहे. ऑपरेशन सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.

बारामुल्ला एन्काउंटर: काही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. एक घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि त्या दरम्यान आमच्या दिशेने गोळीबार करण्यात आला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एलईटीचा एक दहशतवादी मारला गेला. G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आमचे सैन्य सतर्क आहे आणि आम्ही धोका तटस्थ करत आहोत आणि G20 शिखर परिषद यशस्वीपणे आयोजित केली जाईल: एसएसपी बारामुल्ला, आमोद अशोक नागपुरे

J&K News : इंटरनेट सेवा बंद

या भागात 3 मे पासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. तर काल झालेल्या चकमकीत आतंकवाद्यांनी घात लावून केलेल्या विस्फोट केला. त्यामध्ये 5 जवान शहीद झाले होते. त्यानंतर ही चकमक अद्यापही सुरू आहे. दरम्यान, एकूण परिस्थिती पाहता या भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

बारामुल्लाच्या करहामा कुंजर भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल कामाला लागले आहेत. पुढील तपशील पुढीलप्रमाणे असतील, असे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले.

शुक्रवारी (दि.४) राजौरी भागात झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या 5 जवानांची नावे खालील प्रमाणे –

नाईक अरविंद कुमार S/o उज्ज्वल सिंग, गाव- सुरी (चटियाला), पीएस- मारहून, तहसील- पालमपूर, जिल्हा- कांगडा (हिमाचल प्रदेश)

पॅराट्रूपर सिद्धांत छेत्री … s/o खरक बहादूर, P.S. पुलबाजार, जिल्हा- दार्जिलिंग (पश्चिम बंगाल)

लान्स नाईक रुचिन सिंग रावत , राजेंद्र सिंग , गाव – कुनीगढ , तहसील गैरसैन , उत्तराखंड

पॅराट्रूपर प्रमोद नेगी, वडिल देविंदर सिंग नेगी, गाव – शिलाई, जिल्हा – सिरमौर (हिमाचल प्रदेश)

हवालदार नीलम सिंग S/o गुरदेव सिंग, गाव- दलपत, पीएस- जौरियन, अखनूर जिल्हा-जम्मू (जम्मू आणि काश्मीर)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news