संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जम्मूच्या राजौरी दौऱ्यावर; सुरक्षा परिस्थितीचा घेणार आढावा | पुढारी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जम्मूच्या राजौरी दौऱ्यावर; सुरक्षा परिस्थितीचा घेणार आढावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजौरी येथे झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज (दि.६) जम्मू सेक्टरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूला भेट देणार आहेत. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे देखील सिंह यांच्यासोबत जम्मूला भेट देऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हेही दौऱ्यावर आहेत.

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये कांडी येथील जंगलात शुक्रवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान शहीद झाले. तसेच एक जवान जखमी झाला आहे. दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सतरा दिवसांत लष्कराने गमावलेल्या जवानांची संख्या दहा झाली आहे.

राजौरीच्या कंडी जंगलात आणि बारामूल्ला जिल्ह्यातील करहामा कुंजर भागात सुरक्षा दल आणि दहशदतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. तर दूसरीकडे बारामूलाच्या करहामा कुंजर भागात सुरक्षा दलाने एका आतंकवाद्याला ठार केले आहे. जंगलात लपलेल्या आणखी आतंकवाद्यांचा शोध सुरू आहे, असे एएनआयने वृत्त दिले आहे.

हेही वाचा : 

Back to top button