नितीश कुमार यांनी घेतली राहुल गांधींची भेट; विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग | पुढारी

नितीश कुमार यांनी घेतली राहुल गांधींची भेट; विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री यादव यांनी आज (दि.१२) दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. आमच्यात विरोधी ऐक्याबाबत चर्चा झाली आहे. जास्तीत जास्त पक्षांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे, बैठकीनंतर नितीश आणि राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी ही बैठक झाली.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “नितीश कुमार यांचा पुढाकार खूप चांगला आहे. विरोधकांना एकत्र करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून ही विचारधारेची लढाई लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, विचारधारेच्या या लढाईत आज विरोधकांच्या एकजुटीच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेले आहे. एकत्र उभे आहोत, एकत्र लढू – भारतासाठी!”

या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तेजस्वी यादव, काँग्रेसचे बिहार अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह उपस्थित होते. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी झालेल्या या बैठकीनंतर नितीश कुमार यांना यूपीएचे संयोजक बनवले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

नितीश कुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी मीसा भारती यांच्या दिल्लीतील घरी लालू यादव यांची भेट घेतली. नितीश तेजस्वी यादव आणि राजश्री यांच्या घरीही गेले होते. त्यांनी लालू यांची नात कात्यायनी हिला दत्तक घेतले आहे.

काँग्रेसला सोबत घेण्याचा नितीश कुमार यांचा प्रयत्न

विरोधी पक्षाच्या नेत्यांची आज झालेली भेट देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे. नितीशकुमार हे यापूर्वीही विरोधी ऐक्याचे समर्थक होते. यापूर्वीही त्यांनी काँग्रेसला सोबत घेण्याचे बोलले होते. पण काही विरोधी पक्ष त्यांच्या प्रस्तावाच्या विरोधात आहेत. नितीश यूपीएला पुढे नेऊ शकतात, असे आरजेडी आणि काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. नितीशकुमार विरोधी पक्षांना काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी राजी करू शकतात. पंतप्रधान पदाच्या दाव्याचा संबंधात नितीश यांनी आधीच सांगितले आहे की, ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर नेता निवडला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button