दिल्ली : दीड हजार कोटींचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट | पुढारी

दिल्ली : दीड हजार कोटींचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली पोलिसांकडून सुमारे 2800 किलो वजनाचा आणि 1513 कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा बुधवारी (दि.२१) नष्ट करण्यात आला. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना तसेच पोलीस आयुक्त संजय अरोरा हे यावेळी उपस्थित होते.

दिल्लीतील निलोठी भागात हा साठा नष्ट करण्यात आला. केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थाविरोधात दिल्लीत मोहीम उघडण्यात आलेली आहे. त्यानुसार जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ वेळोवेळी नष्ट केले जात आहेत. बुधवारी जो साठा नष्ट करण्यात आला, त्यात चार किलो केटामाईन, पाच किलो स्यूडोफी, 26.16 किलो चरस, 3.4 ग्रॅम एलएसडी, 204 ग्रॅम कोकेन, 2372.83 किलो गांजा, 213.69 किलो हेरॉईन, स्मॅक, 22.37 किलो क्रूड हेरॉईन, 39 पाकविल बाटल्या, एडेसो केएनच्या 32 टॅबलेटस आणि 238.65 किलो सायकोट्रोपिक सबस्टन्सेसचा समावेश होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button