Lionel Messi : मेस्सीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेला सॉल्ट बे आहे तरी कोण? (VIDEO) | पुढारी

Lionel Messi : मेस्सीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेला सॉल्ट बे आहे तरी कोण? (VIDEO)

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शुटआऊटमध्ये ४-२ ने पराभव केला. या विजयासह मेस्सीने तब्बल ३६ वर्षांनंतर अर्जेंटिनाला जगज्जेता बनवले. अंतिम निकालानंतर विजयाचा जल्लोष करताना मेस्सीला शुभेच्छा देण्यासाठी मैदानात आलेल्या सॉल्ट बेकडे मेस्सीने (Lionel Messi) दुर्लक्ष केले. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सॉल्ट बे स्टार फुटबॉलपटू मेस्सीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मेस्सीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेला सॉल्ट बे आहे तरी कोण? जाणून घ्या…

सध्या जगभरात मेस्सी नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. पेनल्टी शूटआऊटमध्ये गतविजेत्या फ्रान्सचा पराभव करून मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाने ३६ वर्षांनंतर फिफा विश्वचषक २०२२ ट्रॉफी जिंकली. कतारच्या लुसेल स्टेडियमवर विजयानंतरच्या उत्सवादरम्यान घेतलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्यात मेस्सी आणि लोकप्रिय शेफ सॉल्ट बे यांचा समावेश आहे. (Lionel Messi)

नुसरत गोकसे ज्याला सॉल्ट बे या नावाने ओळखले जाते. त्याने प्रसिद्धी आणि भरपूर पैसा कमावल्यानंतर लंडन आणि इतर प्रमुख ठिकाणी हाय-एंड रेस्टॉरंटची साखळी निर्माण केली. यानंतर ग्राहकांनी रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या निकृष्ट दर्जाची तक्रार करण्यास सुरूवात केली आणि सॉल्ट बेला ऑनलाईन ट्रोल करण्याची मालिका सुरू झाली. विजयानंतर मेस्सीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सॉल्ट बे पुन्हा चर्चेत आला आहे. इंटरनेटवर लोक त्याला ट्रोल करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सॉल्ट बे स्टार फुटबॉलपटू मेस्सीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दुसरीकडे मेस्सी तिथून निसटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच, यावेळी सॉल्ट बे अर्जेंटिनाच्या इतर खेळाडूंसोबत फोटो काढण्यात यशस्वी झाला. त्यासोबतच त्याने विश्वचषक ट्रॉफी हातात धरून फोटो काढले आहेत. सॉल्ट बेने अर्जेंटिना संघाच्या खेळाडूंसोबत फोटो काढले. काही फोटोंमध्ये त्याने त्याची पदार्थामध्ये मीठ टाकण्याची आयकॉनीक पोझमध्ये फोटो काढले आहेत.

हेही वाचा;

Back to top button