राहुल गांधी यांच्यात शिस्तीचा अभाव : कायदा मंत्री किरेन रिजिजू

राहुल गांधी यांच्यात शिस्तीचा अभाव : कायदा मंत्री किरेन रिजिजू

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात शिस्तीचा अभाव असून, त्यांच्याबद्दल काहीही अंदाज लावता येणे कठीण आहे. चीनच्या मुद्यावर गांधी यांनी त्यांच्या पक्षाचे नेते डॉ. मनमोहन सिंग तसेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सल्ला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. असा टोला केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांना लगावला. आज (दि.२१) संसद भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते.

राहुल गांधी यांनी त्यांची भारत जोडो यात्रा स्थगित करावी, असा सल्ला आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलेला आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय, असे विचारले असता रिजिजू म्हणाले की, गांधी यांच्यात शिस्तीचा अभाव आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणताही अंदाज लावता येणे कठीण आहे. गांधी हे काहीही बोलू शकतात आणि त्यांच्यासाठी योग्य नसले तरी ते कोणत्याही शब्दाचा वापर करु शकतात.

२००५ साली भाजप विरोधी पक्ष होता. त्यावेळी आम्ही चीनचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राज्यसभेतील तत्कालीन नेते प्रणव मुखर्जी यांनी संसदेत या मुद्यावर चर्चा करण्याऐवजी अंतर्गत चर्चा करु या, असा सल्ला दिला होता. त्यानंतर भाजपने सुध्दा हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. राहुल गांधी यांनी डॉ. सिंग आणि मुखर्जी यांचा तो सल्ला लक्षात घेतला पाहिजे, असे रिजिजू म्‍हणाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news