Manipur Bus Accident : सहलीच्या बसला भीषण अपघात; ५ विद्यार्थी ठार, १५ जखमी | पुढारी

Manipur Bus Accident : सहलीच्या बसला भीषण अपघात; ५ विद्यार्थी ठार, १५ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात बुधवारी (दि.२१) शाळेच्या बसला अपघात झाला. या अपघातात ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून १५ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार यारिपोक स्थित थम्बलू हायर सेकेंडरी या शाळेचे विद्यार्थी दोन दिवसांच्या शैक्षणिक सहलीसाठी जात होते. विद्यार्थ्यांची बस लोंगसाईच्या तुबुंग गावात आली असता हा अपघात झाला. (Manipur Bus Accident)

सूत्रांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १५ विद्यार्थ्यांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली जात असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर इंफालच्या मेडिसिटी रूग्णालयात उपचार केले जात आहेत. आत्तापर्यंत २२ विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Manipur Bus Accident)

या अपघातानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. सिंह ट्वीटमध्ये म्हणाले, “आज तुबुंग गावाजवळ विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या अपघात झाल्याने दु:ख झाले. मेडिकल टीम आणि बचावकार्य कार्य करण्यासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. बसमधील सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो”(Manipur Bus Accident)

हेही वाचलंत का?

Back to top button