मोदी सरकारचे यश : योगा शिक्षक, शेफ्सही जातील ऑस्ट्रेलियाला; मुक्त व्यापार करारावर मोहर | पुढारी

मोदी सरकारचे यश : योगा शिक्षक, शेफ्सही जातील ऑस्ट्रेलियाला; मुक्त व्यापार करारावर मोहर

भारतासोबत मुक्त व्यापार कराराला ऑस्ट्रेलियाची मंजुरी

पुढारी ऑनलाईन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मुक्त व्यापार करार झालेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेने या करारला मान्यता दिली असून येत्या ३० दिवसांत या कराराची अंमलबजावणी सुरू होत आहे. या कराराचा सर्वाधिक फायदा भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला होणार आहे. (India Australia free trade)

उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. India-Australia Economic Cooperation & Trade Agreement असे या कराराला नाव आहे. ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री डॉन फॅरेल यांनी ३० दिवसांत कराराची अंमलबजावणी सुरू होणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. भारतात असे करार कॅबिनेटच्या मान्यतेने होतात, तर ऑस्ट्रेलियात यासाठी संसदेची मंजुरी लागते. “या करारामुळे दोन्ही देशांत रोजगार निर्मितीला चालना मिळेल, तसेच ग्राहकांनाही याचा फायदा होणार आहे.”

ऑस्ट्रेलियातून भारतात स्वस्तात कच्चा माल येणार आहे, त्याचा फायदा स्थानिक उद्योगांना होईल शिवाय भारतीय ग्राहकांना ऑस्ट्रेलियातील वस्तू आणि सेवांचा लाभ होणार आहे.

आयटी क्षेत्राला सर्वाधिक फायदा

गोयल म्हणाले अशा करारांचा सर्वाधिक फायदा हा सेवाक्षेत्राला होता. त्यामुळे आयटी उद्योगाला या कराराचा मोठा फायदा होणे अपेक्षित आहे. हा करार होत असताना वस्तू आणि सेवा या दोन्हींबद्दल वाटाघाटी झाल्या आहेत, असे गोयल म्हणाले.

योगा प्रशिक्षकांनाही व्हिसा

या करारात योगा शिक्षण आणि भारतीय शेफ्स यांनाही ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळणार आहे.

विद्यार्थ्यांनाही संधी

ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची संधी मिळेल, असे गोयल म्हणाले.

हेही वाचा

 

Back to top button