Agniveer Scheme : अग्नीवीरांच्या वेतन पॅकेजसाठी ‘या’ ११ बॅंकांसोबत करार | पुढारी

Agniveer Scheme : अग्नीवीरांच्या वेतन पॅकेजसाठी 'या' ११ बॅंकांसोबत करार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय लष्कराने नोंदणीकृत अग्नीवीरांच्या वेतन पॅकेजसाठी तसेच त्यांना बँकिंग सुविधा प्रदान करण्यासाठी ११ बॅंकांसोबत सामंजस्य करार केला आहे. या बॅंकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अँक्सिस बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि बंधन बँकेचा समावेश आहे. ( Agniveer Scheme )

लेफ्टनंट जनरल व्ही. श्रीहरी, डीजी (एमपी आणि पीएस) आणि बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतेच या करारांवर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. अग्नीवीर वेतन पॅकेज अंतर्गत असलेली वैशिष्ट्ये आणि लाभ संरक्षण वेतन पॅकेज सारखेच आहेत. याव्यतिरिक्त, बँकांनी अग्निवीरांना त्यांच्या उद्योजकीय कौशल्यांना चालना देण्यासाठी आणि वाढविण्यासाठी अल्पदराने कर्ज (सॉफ्ट लोन) देऊ केली आहेत. (Agniveer Scheme) अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीरांची पहिली तुकडी जानेवारी २०२३ पर्यंत प्रशिक्षण केंद्रांमध्ये सामील होणार असाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button