लोन ॲपचा सुळसुळाट – गुगल, ॲपल यांच्यावरही नोंद होणार गुन्हा – cops to book google apple in loan app cases

Online Loan Apps
Online Loan Apps
Published on
Updated on

विजयवाडा, पुढारी ऑनलाईन डेस्क – ऑनलाईन लोक ॲपचा सुळसुळाट रोखण्यासाठी आंध्र प्रदेश पोलिसांनी गुगल आणि ॲपल यांच्यावरही गुन्हा नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ॲप निर्माते, इंटरनेट सेवा पुरवणारे आणि या ॲपशी संबंधित बँका यांच्यावरही गुन्हा नोंद केला जाणार आहे. (cops to book google apple in loan app cases)

डीजीपी के. व्ही. राजेंद्रनाथ रेड्डी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे. ऑनलाईन ॲपवर पोलीस कारवाई करताना, काय प्रक्रिया असली पाहिजे, याचे नियम आंध्र प्रदेश पोलिसांनी निश्चित केले आहेत. या नियमांची माहिती रेड्डी यांनी दिली आहे.

ते म्हणाले, "येथून पुढे लोन अॅपच्या गुन्ह्यांत विविध सेवा पुरवठादरांवरही कारवाई होणार आहे. CrPCच्या विविध तरतुदींनुसार हे गुन्हे नोंद होतील. जर सेवादाते नियम पाळत नसतील, तर हे सहगुन्हेगार ठरतात."

बँका कोणतीही खातरजमा न करता व्यक्ती आणि संस्थांना खाते देत आहेत, त्यामुळे संशयास्पद खात्यांची माहिती द्यावी यासाठी आम्ही विविध बँकांना पत्रे लिहिली आहेत. यातील बरेच ॲप हे चीनमधील असले तरी त्यांचे डेव्हलपर भारतातील आहेत. ॲप बनवून देताना, त्याचा कसा वापर होणार आहे, याची माहिती डेव्हलपरला असली पाहिजे, असे रेड्डी म्हणाले आहेत.

जर ॲप गुन्हेगारी कामांसाठी वापरसे जाणार असेल तर ॲप होस्ट करणाऱ्या गुगल आणि ॲपल सारख्या कंपन्या सहगुन्हेगार होतील. रेड्डी यांनी नागरिकांनी लोन ॲप डाऊन लोड करू नयेत आणि आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये असे आवाहन केले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news