Mulayam Singh Yadav | मुलायमसिंह व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक, PM मोदींनी अखिलेश यांना फोन करुन केली विचारपूस | पुढारी

Mulayam Singh Yadav | मुलायमसिंह व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक, PM मोदींनी अखिलेश यांना फोन करुन केली विचारपूस

लखनौ : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुलायमसिंह यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांचा प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

काल त्यांच्या तब्येतीविषय कळताच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, डिंपल यादव, शिवपाल यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य रुग्णालयात पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुलायमसिंह यांच्या तब्येतीविषयी अखिलेश यांच्याकडे विचारपूस केली. पंतप्रधान मोदींनी फोन करुन अखिलेश यांच्याकडे चर्चा केली.

मेदांता रुग्णालयाकडून मुलायमसिंह यांच्या प्रकृतीविषयी अपडेट्स दिले जात आहेत. पुढील २४ तास त्यांच्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. मुलायमसिंह (Mulayam Singh Yadav) यांना यूरिन इन्फेक्शन झाले आहे. त्यांना एक महिन्याआधीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली आहे. त्यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरु आहेत. डॉक्टर त्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवून आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मेदांताच्या आयसीयूत हलवण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button