मुलायमसिंग यादव यांना गुरूग्राममधील मेदान्ता रुग्णालयात हलविले | पुढारी

मुलायमसिंग यादव यांना गुरूग्राममधील मेदान्ता रुग्णालयात हलविले

पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली – मागील काही काळापासून आजारी असलेले समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांना आज ( दि. २ )  रविवारी गुरूग्राममधील मेदान्ता रुग्णालयात हलविण्यात आले. यादव यांची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

डॉ. सुशीला कटारिया यांच्या देखरेखीखालील पथक यादव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान यादव यांचे पुत्र अखिलेश हे गुरूग्रामला पोहोचले आहेत. दुसरीकडे दिल्लीत असलेले मुलायमसिंग यांचे बंधू शिवपाल यादव हेही मेदान्ता रुग्णालयात जाणार असल्याचे समजते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button