मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, नितीन गडकरींची भेट घेणार | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, नितीन गडकरींची भेट घेणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण ताजे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, बुधवारी दिल्ली दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटातील काही आमदारदेखील त्यांच्या सोबत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनातील ३० तर जुन्या महाराष्ट्र सदनातील २० खोल्या आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याचे कळतेय.

राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ही दोन दिवसीय दिल्लीवारी मुख्यमंत्री करणार आहेत. दौऱ्यादरम्यान ते राज्याच्या विकासासाठी केंद्राकडून हव्या असलेल्या मदतीसंबंधी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. शिवसेना पक्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यासंबंधी काही ज्येष्ठ वकिलांच्या भेटी शिंदे घेऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

Back to top button