धार्मिक नावांच्या वापरावरुन सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस | पुढारी

धार्मिक नावांच्या वापरावरुन सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : राजकीय पक्षांकडून धार्मिक नावे तसेच धार्मिक चिन्हे वापरली जातात. या मुद्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. धार्मिक नावे आणि चिन्हांचा वापर करण्यास आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली.

जे राजकीय पक्ष धार्मिक नावे आणि चिन्हे वापरतात, अशा पक्षांची मान्यता रद्द करावी, अशी विनंती याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. धर्माच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर असेल तर पक्षाचे नावसुध्दा धार्मिक आधारावर असू शकत नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. यासाठी याचिकाकर्त्याने मुस्लिम लीग व हिंदू एकता दल या दोन पक्षांची उदाहरणे दिली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निवडणूक आयोगाबरोबर केंद्र सरकारकडून देखील एका महिन्याच्या आत उत्तर मागविले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button