Amit Shah’s Marathi tweet : अमित शहा यांच मराठीमध्ये ट्विट, “गणेशोत्सवादरम्यान मुंबईत…” | पुढारी

Amit Shah's Marathi tweet : अमित शहा यांच मराठीमध्ये ट्विट, "गणेशोत्सवादरम्यान मुंबईत..."

 पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठीमध्ये ट्विट करत मुंबई भेटीसंदर्भात सांगितले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल”. (Amit Shah’s Marathi tweet)

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.अमित शहा यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. यानंतर ते भाजपच्या नगरसेवकांशीही चर्चा करणार आहेत. दरम्‍यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. सध्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या महत्‍वाच्या नेत्‍यांसोबत त्‍यांची बैठक सुरू आहे. (Amit Shah’s Marathi tweet)

दरम्‍यान, आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी भाजप आणि शिंदे गटाला अमित शहा काय कानमंत्र देणार हे महत्‍वाचे ठरणार आहे. एकुणच शिंदे गट आणि भाजपने महाराष्‍ट्रात सत्‍ता स्‍थापन केल्‍यावर अमित शहा यांचा हा पहिलाच दौरा आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button