राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून तीन तास चौकशी, गेहलोत यांच्‍यासह ज्‍येष्‍ठ नेत्‍यांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात | पुढारी

राहुल गांधी यांची 'ईडी'कडून तीन तास चौकशी, गेहलोत यांच्‍यासह ज्‍येष्‍ठ नेत्‍यांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
नॅशनल हेरॉल्‍ड प्रकरणी आज काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी हे दिल्‍लीतील सक्‍तवसुली संचालनालय ( ईडी ) कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले. येथे ईडीच्‍या अधिकार्‍यांनी त्‍यांची सलग तीन तास चौकशी केली. मीडिया रिपोर्ट्‍सनुसार त्‍यांना ५० हून अधिक प्रश्‍न विचारण्‍यात आले. चौकशी संपल्‍यानंतर राहुल गांधी ईडी कार्यालयातून रवाना झाल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेस नेत्‍यांच्‍या भेटीला प्रियांका गांधी

ईडी चौकशीच्‍या निषेधार्थात राजधानी दिल्‍लीत काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते एकवटले. ईडी कार्यालयासमोर निदर्शने केल्‍याप्रकरणी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते अशोक गेहलोत, भूपेश बघेल, दिग्‍विजय सिंह, हरीश रावत, रणदीपसिंह सुरजेवाला यांच्‍या अन्‍य दिग्‍गज नेते व कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. यानंतर त्‍यांना तुघलक रोड पोलीस ठाण्‍यात नेण्‍यात आले. यावेळी काँग्रेस नेत्‍या त्‍यांना भेटण्‍यासाठी पोलिस ठाण्‍यात गेल्‍या.

राहुल गांधी यांच्‍या नेतृत्‍वाखाली ‘सत्‍याचा संग्राम’ सुरु राहिल : सुरजेवाला

आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेता रणदीप सुरजेवाला म्‍हणाले की, “देशाच्‍या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटश सरकारी काँग्रेस पक्षाचा आवाज दडपू शकली नाही. भाजप सरकारने देशात अघोषित आणीबाणी जाहीर केली आहे. आम्‍ही आज देशभरात शांततामार्गने ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. नॅशनल हेराल्‍ड हा घोटाळा नाही. आम्‍ही भाजप सरकारसारख देश विकलेला नाही.”

हेही वाचा : 

 

Back to top button