वाघोली रस्त्यावर होतोय वाहनचालकांना मनस्ताप; जलवाहिनीसाठी होणार्‍या खोदाईचा परिणाम | पुढारी

वाघोली रस्त्यावर होतोय वाहनचालकांना मनस्ताप; जलवाहिनीसाठी होणार्‍या खोदाईचा परिणाम

येरवडा, पुढारी वृत्तसेवा: लोहगाव- वाघोली रस्त्यावर सुरू असलेल्या ’एल अँड टी कंपनी’च्या कामामुळे रोज वाहतूक कोंडी होत आहे.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सदर काम सुरू असले तरी खोदाई केल्यानंतर रस्ता तातडीने पूर्ववत न केल्यामुळे रोज होणार्‍या वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

लोहगाव- वाघोली रस्ता गेल्या दोन महिन्यांत विविध कामांसाठी खोदण्यात आला आहे. जिओ कंपनी केबलसाठी, चार्जिंग पॉइंटला वीजपुरवठा करण्यासाठी यासह जलवहिन्या टाकण्यासाठी रस्ता वारंवार खोदण्यात आला आहे. आता समान पाणीपुरवठा अंतर्गत जलवाहिनीसाठी ओझोन बिल्डिंगजवळ खोदण्यात आला आहे. खोदाई केलेला रस्त्याचा राडारोडा तसाच पडून आहे.

खड्डेही समान भरले नसल्याने या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. महापलिका पथ विभाग या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने या रस्त्यासाठी कोणी वाली नसल्याचे बोलले जात आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तीन- तीन मीटर दोन्ही बाजूला रस्ता रुंदीकरण करून रस्ता करण्याचे नियोजन आहे. मात्र, सध्या खोदाईच्या कामामुळे तासनतास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे.

हेही वाचा 

वाहतूक पोलिस टोळधाडीला लगाम; आता फक्त वाहतूक नियमन करण्याचे आदेश

उंबर्‍या गणपती चौकात सतत होणार्‍या वाहतूक कोंडीने धायरीकर हैराण

बांधकामावर पालिकेचा हातोडा; भारती विद्यापीठ परिसरात कारवाई

Back to top button