भोपाळ : १६ वर्षाच्या नवर्‍यासोबत ३२ वर्षांची नवरी पळाली! | पुढारी

भोपाळ : १६ वर्षाच्या नवर्‍यासोबत ३२ वर्षांची नवरी पळाली!

भोपाळ; वृत्तसंस्था : मध्य प्रदेशच्या सिंगरौली येथे 18 मे रोजी सरपंचाच्या सांगण्यावरून ३२  वर्षीय महिलेचे 16 वर्षीय अल्पवयीन तरुणाशी बळजबरीने लग्न केल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हे गाव खुटारच्या दक्षिणेकडील असून आता संबंधित मुलाच्या वडिलांनी महिला आणि बाल विकास विभाग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार केली होती.

आयोगाचे पथक मुलाला सोडवण्यासाठी पोहोचले तेव्हा ती महिला तिच्या अल्पवयीन पतीसह पळून गेली. यानंतर आयोगाचे सदस्य ब्रजेश चौहान यांनी आरोपी महिला आणि तिच्या कुटुंबीयांवर अपहरणासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे कुटुंबीयही बेपत्ता आहेत. बहुधा महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी मुलाला कुठेतरी ओलिस ठेवले असावे, असा तर्क आहे. बाल आयोगाने या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे लग्न रद्द करण्याचे निर्देश दिले होते. महिलेच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

दरम्यान, घटस्फोटित महिला त्यांच्याच समाजातील असल्याचे मुलाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. सर्वप्रथम आपल्या मुलाचे लग्न आपल्या नातेवाईकाच्या मुलीशी कसे तरी करून देण्याचे सांगितले. जेव्हा तिला नकार दिला तेव्हा तिने सरपंचाची भीती दाखवली. यानंतर महिलेने सरपंचासमोर आरोप केला.

हेही वाचा

Back to top button