Ambassidor : लोकप्रिय अ‍ॅम्बेसेडर कारची पुन्हा एकदा होणार दमदार एन्ट्री! | पुढारी

Ambassidor : लोकप्रिय अ‍ॅम्बेसेडर कारची पुन्हा एकदा होणार दमदार एन्ट्री!

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भारतीय बाजारपेठेत चारचाकी गाड्यांचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. विविध कंपन्यांच्या गाड्यांना भारतीत लोकही पसंती दाखवत खरेदी करतात. तुमच्या खिशात जितके जास्त पैसे असतील, तितक्या मोठ्या बजेटची चारचाकी गाडी  तुम्ही खरेदी करू शकता. मात्र, एकेकाळी अ‍ॅम्बेसेडर या चारचाकी गाडीची मागणी देशात सर्वाधिक होती. सर्वसामान्यांपासून ते पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, नेते, अभिनते, आयएएस, आयपीएस अशा सर्व व्हीआयपीपासूंन ते डॉक्टर्स ही चारचाकी घेऊन फिरत असत. या अ‍ॅम्बेसेडरला राजदूत असं देखील म्हटलं जातं. ही राजदूत आता पुन्हा एकदा बाजारपेठेत दिसणार आहे.

हिंदुस्तान मोटर्सची (HM) अ‍ॅम्बेसेडर ही कार पुन्हा एकदा बाजारपेठेत दिसणार असल्याने चर्चेत आली आहे. खरं तर, ही आयकॉनिक चारचाकी इलेक्ट्रिक अवतार घेऊन पुनरागमन करणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार, एचएम अ‍ॅम्बेसेडर ही कार इलेक्ट्रिक बनवण्यावर काम करत आहे. तसेच, कंपनी पेट्रोल आणि डिझेल इंजिन मॉडेल्सवर देखील काम करत आहे.

Ambassador electric car (DC2 e Amby) launch date and specifications revealed

चेन्नई येथील प्लांटमध्ये बनवली जाणार नवी अ‍ॅम्बेसेडर

एका रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅम्बेसेडर इलेक्ट्रिक मॉडेल चेन्नई प्लांटमध्ये बनवले जाईल. हा प्लांट सीके बिर्ला ग्रुप कंपनी हिंद मोटर फायनान्शियल कॉर्प ऑफ इंडियाद्वारे नियंत्रित केला जातो. एका मुलाखतीमध्ये, एचएमचे संचालक उत्तम बोस यांनी हे स्पष्ट केले आहे की हिंदुस्थान मोटर्स नवी अ‍ॅम्बेसिडर कार ही इलेक्ट्रिक पर्यायामध्ये बनविण्यावर काम करत आहे. एचएमने 2014 मध्ये शेवटची अ‍ॅम्बेसिडर कार बनवली होती. हिंदुस्थान मोटर्स ही भारतातील सर्वात जुनी कार उत्पादक कंपनी होती. 2014 नंतर या कारचे उत्पादन बंद करण्यात आले. तथापि, अ‍ॅम्बेसेडर कोणत्या पॉवरट्रेनसह पुनरागमन करेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा

Back to top button