Indian Ianguage : अमेरिकेतील सरकारी बेबसाईटचे हिंदी, गुजराती, पंजाबीमध्ये होणार भाषांतर

Indian Ianguage : अमेरिकेतील सरकारी बेबसाईटचे हिंदी, गुजराती, पंजाबीमध्ये होणार भाषांतर
Published on
Updated on

न्यूयॉर्क; पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या (US) राष्ट्राध्यक्षीय आयोगाने (American Presidency Commission) व्हाईट हाऊस (White House) आणि इतर फेडरल एजन्सीच्या वेबसाइट्सचे (government website) आशियाई-अमेरिकन आणि पॅसिफिक प्रदेशातील लोकांमध्ये बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये भाषांतर करण्याची शिफारस केली आहे. या भाषांमध्ये हिंदी, गुजराती आणि पंजाबी (Indian Ianguage) भाषांचाही समावेश आहे. आशियाई अमेरिकन (एए), नेटिव्ह हवाईयन आणि पॅसिफिक आयलँडर्स (NHPI) यांच्या अध्यक्षीय सल्लागार आयोगाने या भाषांचा समावेश करण्याच्या शिफारशींना अलीकडेच मान्यता दिली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला आयोगाच्या बैठकीत आशियाई अमेरिकन (एए), नेटिव्ह हवाईयन आणि पॅसिफिक आयलँडर्स (NHPI) द्वारे बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये फेडरल एजन्सींनी (Federal Agencies in USA) त्यांचे प्रमुख दस्तऐवज, डिजिटल सामग्री आणि अर्ज त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध करून द्यावेत असे सुचवले होते. (Indian Ianguage)

इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसलेल्या लोकांपर्यंत सार्वजनिक आणि आपत्कालीन सुचना देखिल उपलब्ध व्हाव्यात, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. तसेच फेडरल सरकारने आपत्कालीन / आपत्ती-विरोधी अभियान, धोरण तयार करणे, व्यवस्थापन आणि इतर योजना समावेशक यामध्ये करावा. शिवाय ज्या लोकांना इंग्रजी चांगले कळत नाही त्या लोकांचे अनुभव आणि शिफारसी दखल घेतली जावी. या सूचना आता व्हाईट हाऊसकडे पाठवण्यात आल्या आहेत, त्यावर अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) निर्णय घेतील. (Indian Ianguage)

असे नाही की, या सूचना अचानक करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया तेव्हा पासून चालू जेव्हा भारतीय – अमेरिकन असणारे अजय जैन भुतोरिया यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यासाठी अनेक भाषांमध्ये प्रचार केला आणि बायडेन यांनी ती निवडणूक जिंकली. हिंदी, गुजराती, पंजाबी आणि तेलगू (Indian Ianguage) भाषांमध्ये केलेल्या प्रचाराचा समाजावर मोठा प्रभाव पडला होता.

भूटोरिया एक जाने-माने कारोबारी और इस आयोग के सदस्य हैं. उन्होंने बैठक में कहा कि लोगों को किसी खास भाषा में ही सूचना उपलब्ध कराने से सूचना अधिक लोगों तक नहीं पहुंच पाएगी. प्रसिद्ध उद्योगपती आणि या आयोगाचे सदस्य भुतोरिया यांनी बैठकी दरम्यान सांगितले की, केवळ एका विशिष्ट भाषेत लोकांना माहिती देऊन ती माहिती अधिक लोकांपर्यंत पोहचू शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news