सुशांत सिंहच्या टी-शर्ट्समधील संदेशांचा अर्थ काय? | पुढारी

सुशांत सिंहच्या टी-शर्ट्समधील संदेशांचा अर्थ काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क; अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा अभिनयाच्या पलिकडे जाऊन वाचनासह विज्ञान आणि क्रिएटिव्हिटीमध्ये रुची दाखवत होता. मूळात, एका संघर्षांपासून यशाची उंची गाठलेल्या सुशांतने तरुण पिढीला प्रेरणा दिली होती. तो कमी बोलत होता आणि विचार जास्त करत होता. कित्येक इव्हेंटमध्ये त्याच्या अबाेल स्वभावाचाही उल्लेख करण्यात आला होता. त्याच्या भावनिकतेवर कुणाला जास्त बोलता येत नव्हतं. चेहऱ्यावर काय स्मित ठेवणाऱ्या सुशांतच्या मनात किती उदासीनता होती, ही त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसत होतं. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर तो घालत असलेले टी-शर्ट्स चर्चेत आले. या टी-शर्ट्समधून तो काहीतरी सांगू इच्छित होता, त्याचं एक वेगळं रहस्य होतं. त्यातून विज्ञान आणि भावनिकतेची सांगड दिसत होती. सुशांतने घातलेल्या या रहस्यमय फार्म्युला असेलेल्या टी-शर्टबद्दल जाणून घेऊ…

SURVIVED : सुशांतने घातलेल्या टी-शर्टवर लिहिलंय ‘सर्वाइव्ड’. सर्वाइव्ड हा शब्द जास्त करून वापर अंतर्मुख व्यक्ती करतात. अशा व्यक्ती जास्त करून हा टी-शर्ट घालतात. जेव्हा काही लोक बाहेरच्या जगातील असंख्य आव्हानांशी टक्कर देऊन शेवटी घरी परततात, ते लोकांच्या संदर्भात खरंतर अंतर्मुख हा शब्द वापरला जातो. सुशांतचं व्‍यक्‍तिमत्‍व सुद्धा असंच काहीस अंतर्मुख होतं. 

DREAMER : एक प्रसिद्ध अभिनेता होण्यापलिकडे जाऊन सुशांतने आपल्या समाधानासाठी अनेक स्वप्नं पाहिलेली होती. ती पूर्ण करण्याची त्याची इच्छाही होती. इतकंच नाही, तर त्याने आपल्या स्वप्नांची लिस्टच तयार केलेली होती. त्याच्या याच स्वभावाला अनुसरून असणाऱ्या ‘ड्रिमर’ या शब्दाला सुशांतने टी-शर्टवर दाखविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. 

COMFORTABLY SINGLE : प्रेम, लग्न, मैत्री अशा अनेक नात्यांच्या गुंत्यांत अडकेल्या व्यक्तींची आणि त्यांना कराव्या संघर्षाची कल्पना सुशांतला आली असावी, त्यामुळेच ‘मी सिंगलच बरा’ म्हणजे कन्फर्टेबली सिंगल, ही अक्षरं असणारा टी-शर्ट सुशांतने घातलेला आहे. मी एक अंतर्मुख व्यक्ती आहे आणि मी स्वसानिध्यातच खूप खूश आहे, असंही सुशांत आपल्या टी-शर्टमधून सांगण्याचा प्रयत्न करत असे.  

THE TRUTH WILL SET YOU FREE : सुशांतच्या या टी-शर्टवर जे लिहिलंय, ते पाहून सुशांतचं वाचन चाौफेर असावं, असं स्‍पष्‍ट हाेते. कारण, तो या वाक्यात असं सांगू पाहतोय की, ‘सत्यच तुम्हाला मुक्त करू शकेल’. चाौफेर वाचन आणि सखाेल विचार करणारी व्यक्तीच अशा वाक्यांच्या अर्थांचा शोध घेऊन जगासमोर तशाचप्रकारे वावरत असतात. ते आपल्या आजूबाजूच्या साधा-साध्या कृतीतून काहीतरी मॅसेज जगाला देण्याचा प्रयत्न करत असतात. सुशांत एक चांगला फायटर होता, त्यामुळे तो सर्व परिस्थितीशी तोंड देऊन सत्य काय, याच्या शोधात होता, असं त्याच्या टी-शर्टवरुन दिसतंय. 

F*CK FAME : पैसा आणि प्रसिद्ध, हेच जगण्याचं शेवटचं साध्य असू शकत नाही, त्यामुळेच कदाचित सुशांत आपल्या टी-शर्टमधून सांगू पाहत होता की, प्रसिद्धीच म्‍हणजे सर्व काही असू शकत नाही. जगाचा सामाजिक व्यवहार पाहून सुशांत या निष्कर्षापर्यंत पोहोचला होता की, खूप मिळवणं आणि प्रसिद्ध होणं, साध्य केलं. पण, शेवटी हे लक्षात आलं की, यशाचा खरा अर्थ भौतिकवादी होणं नाही. त्यामुळे सुशांतचे फेमस असण्याबद्दल विचार संपलेले होते, असं दिसतं. 

WHO ARE THE RULERS : सुशांतच्या टी-शर्टवरुन त्याचं व्‍यक्‍तिमत्‍व कसं होतं, याची साधरणपणे कल्पना येते. या टी-शर्टमधून तो सामाजिक प्रश्न उपस्थित करू इच्छितो. तो म्हणतो की, “राज्यकर्ते कोण आहेत?” त्याच्या या प्रश्नांतून तो सामाजिक भान असलेला होता, हे स्पष्ट होतं. 

Dont be a d3s/dt3 : सुशांतच्या ब्राऊन रंगाच्या टी-शर्टवर लिहिलेली अक्षरं ही भौतिकशास्त्रातील एक फाॅर्म्युला आहे. ज्याचा अर्थ Jerk असा होता, मराठीत ‘धक्का’ असा होतो. सुशांतच्या या टी-शर्टमुळे सोशल मीडियावर ‘स्टार किड्स’ ट्रोल झाले होते. सुशांतच्या चाहत्यांनी स्टार किड्सबराेबर त्‍याची तुलना केली हाेती. या फोटोमुळे इतर बाॅलिवुड्स स्टार किड्सचा ‘आयक्यू’ आणि सुशांतचा ‘आयक्यू’ जास्त असल्याचा दावा त्‍याचे चाहते करत हाेते.

सुशांतची आत्महत्या जसं एक रहस्य बनून गेलं. तसंच तो जगात असतानाही एक गूढ अशी व्यक्ती म्हणून त्याची ओळख होती. प्रामुख्याने खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या सुशांतने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत यश मिळविण्‍यासाठी  संघर्ष केला. प्रस्थापित अभिनेत्यांशी स्पर्धा करत स्वतःची ओळख निर्माण केली. तरीही कुठंतरी त्याची स्वप्न अपूरीच होती, ती अपूरी स्वप्नचं त्याच्या कपड्यांमधून दिसत होती.

Back to top button