IND vs PAK : अबब!, भारत-पाक सामन्याचे तिकिट तब्बल १६ लाखांचे; ललित मोदी संतापले | पुढारी

IND vs PAK : अबब!, भारत-पाक सामन्याचे तिकिट तब्बल १६ लाखांचे; ललित मोदी संतापले

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना न्यूयॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे. हा स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना 9 जूनला होणार आहे. आयसीसीने याबाबत तिकिटेही जारी केली असून, त्याची किंमत लाखांच्या घरात आहेत. हे पाहून ललित मोदी संतापले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) जूनमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक 2024 साठी पूर्णपणे तयार आहे. 2 जून ते 29 जून या कालावधीत वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. या कालावधीत न्यूयॉर्कमध्ये 8 सामने खेळवले जातील. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याच्याही समावेश आहे.

आयसीसीने याबाबत तिकिटेही जारी केली असून, त्याची किंमत लाखांत आहे. आयसीसीनुसार, डायमंड श्रेणीच्या तिकिटाची किंमत 20 हजार डॉलर्स (सुमारे 16.65 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. हे पाहून ललित मोदी संतापले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांनी भावना व्यक्त केल्या.

25 हजार रुपयांपासून तिकिटांची सुरूवात

राजकीय तणावामुळे 2012 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. तेव्हापासून हे दोन संघ आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कपमध्येच आमनेसामने येत आहेत.

त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याची चाहत्यांमध्ये क्रेझ खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत आयसीसीलाही याचा फायदा घ्यायचा आहे आणि तिकिटाची किंमत लाखो रुपये ठेवली आहे. आयसीसीनुसार, भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची किंमत 300 डॉलर्स (सुमारे 25 हजार) पासून आहे.

मोदींनी आयसीसीला फटकारले

X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मोदींनी लिहिले की, ‘आयसीसी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी डायमंड क्लबची तिकिटे २० हजार डॉलरमध्ये विकत आहे हे जाणून धक्का बसला. नफा कमावण्यासाठी नव्हे तर या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि चाहत्यांना जोडण्यासाठी हा विश्वचषक अमेरिकेत आयोजित केला जात आहे. 2750 डॉलर (सुमारे 2.28 लाख रुपये) मध्ये तिकीट विकणे म्हणजे क्रिकेट नाही.

Back to top button